कर्जमाफीसाठी बँकेला ठोकले कुलूप

By Admin | Published: July 15, 2017 11:50 PM2017-07-15T23:50:55+5:302017-07-15T23:53:13+5:30

औंढा नागनाथ : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व गरजूंना तत्काळ कर्ज वाटपासाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने शनिवारी दुपारी १ वाजता आंदोलन करून बँकेला टाळे ठोकले आहे.

Locked lock to bank for debt waiver | कर्जमाफीसाठी बँकेला ठोकले कुलूप

कर्जमाफीसाठी बँकेला ठोकले कुलूप

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व गरजूंना तत्काळ कर्ज वाटपासाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने शनिवारी दुपारी १ वाजता आंदोलन करून बँकेला टाळे ठोकले आहे.
महाराष्ट्र शासनाने कर्जमाफी करून अनेक दिवस लोटले आहेत; परंतु बँकेच्या माध्यमातून अद्याप एकाही शेतकऱ्याला कर्जाचे वाटप केले नाही. पुनर्गठन जागेवरच आहे. शासनाने कर्जमाफी केलेल्या शेतकऱ्यांची यादी बँकांनी डकविली नाही. शेतकरी बँकांमध्ये चकरा मारीत आहेत. बँकांमधून त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याविरोधात शासनाने तत्काळ सातबारा कोरा करावी, तत्काळ शेतकऱ्यांचे पुनर्गठन करावे, महामंडळाचे कर्जमाफ करावे, मुद्रा लोणअंतर्गत गरजूंना कर्जाचे वाटप करावे, या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील एसबीआय बँकेसमोर कार्यकर्त्यांनी रूमणे घेऊन एक तास आंदोलन केले.
यादरम्यान, कार्यकर्त्यांनी बँकेला कुलूपही लावले. ते नंतर पोलीस प्रशासनाने उघडले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार केशव वीरकुंवर यांना देण्यात आले.
निवेदनावर बाबूराव घोंगडे, गणेश खिल्लारे, बाळासाहेब घनसावंत, सदानंद मुळे, भीमा सुतारे, बाळू गायकवाड, लिंबाजी काशिदे, राहुल पुंडगे, विजय खिल्लारे, सुदाम खिल्लारे, नितीन गव्हाणे, विनोद जोगदंड, प्रवीण वाकळे, अमोल घोंगडे, नीलेश डुमने, चंद्रकांत दूधमल, अनिल टोम्पे, सोनू घोंगडे, राहूल खिल्लारे, सिद्धार्थ खिल्लारे आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Locked lock to bank for debt waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.