गोदाम फोडून लाखोंचा ऐवज लंपास; आरोपीस अटक
By Admin | Published: June 22, 2017 11:22 PM2017-06-22T23:22:20+5:302017-06-22T23:24:20+5:30
हिंगोली : तालुक्यातील लिंबाळा मक्ता उपप्रादेशिक परिवहन परिसरातील गोदाम फोडून चोरट्यांनी २ लाख ३० हजार ६०० रूपये किमतीचे साहित्य लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : तालुक्यातील लिंबाळा मक्ता उपप्रादेशिक परिवहन परिसरातील गोदाम फोडून चोरट्यांनी २ लाख ३० हजार ६०० रूपये किमतीचे साहित्य लंपास केल्याची घटना २१ जूनच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली. चोरी प्रकरणातील एका आरोपीस पोलिसांनी २२ जून रोजी अटक केली आहे.
हिंगोली तालुक्यातील लिंबाळा मक्ता परिसरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. बांधकामासाठी लागणारे साहित्य गोदामात ठेवलेले आहे. गोदामाचे शटर वाकवून चोरट्यांनी २ लाख ३० हजार ६०० रूपये किमतीची टाईल्स (फरशी) लंपास केल्याची घटना २१ जूनच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी मॅनेजर परमेश्वर सतीशराव दहिफळे (विनायक कन्सट्रक्शन अंबाजोगाई) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला होता. चोरी प्रकरणातील तपासाची चक्रे फिरविली. त्यामुळे आरोपीस जेरबंद करण्यात आले आहे. आरोपी राम्या बाभल्या चव्हाण (वय २८, रा.लिंबाळा) यास अटक करण्यात आल्याची माहिती हिंगोली ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी दिली.