Lok Sabha Election 2019 : मतदार यादीत अनेकांच्या नावावर ‘डिलीट’चा शिक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:32 PM2019-04-24T12:32:51+5:302019-04-24T12:36:50+5:30

सहा बुथवर ५ हजार ९२२ मतदानापैकी ४०० मतदारांच्या नावावर डिलीटचा शिक्का

Lok Sabha Election 2019: many voter unable to cast votes due to delete mark on electoral roll | Lok Sabha Election 2019 : मतदार यादीत अनेकांच्या नावावर ‘डिलीट’चा शिक्का

Lok Sabha Election 2019 : मतदार यादीत अनेकांच्या नावावर ‘डिलीट’चा शिक्का

googlenewsNext

औरंगाबाद/पिंप्रीराजा : औरंगाबाद शहरासह तालुक्यातील पिंप्रीराजा आणि इतर काही गावांमध्ये मतदारांची नावे ‘डिलीट’ केल्याचे समोर आले. 

पिंप्रीराजा येथील एकूण  सहा बुथवर ५ हजार ९२२ मतदानापैकी ४०० मतदारांच्या नावावर डिलीटचा शिक्का आढळून आला. त्यामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिले. या यादीत काही नावे मृत व्यक्तींची होती; पण यात अनेक जिवंत मतदारांच्या नावांचाही समावेश असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे काही मतदारांनी निवडणूक अधिकाऱ्यांना विनंती केली; पण तुमचा फोटो मतदार यादीत नसल्यामुळे तुम्हाला मतदान करता येणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे मतदार मतदान न करताच परतले. 

यासंदर्भात बीएलओ म्हणाले की, ग्रा.पं.ला सर्व याद्या दिल्या होत्या; पण मतदारांनी फोटो किंवा कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे त्यांचे नाव डिलीट झाल्याचे सांगितले. यासंदर्भात सरपंच म्हणाले की, गावातील अनेक मतदारांचे नाव डिलीट झाले आहे. ते दुरुस्त करून घ्यावे, अशी विनंती तालुका निवडणूक अधिकारी परदेशी यांना केली; पण त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याचा आरोप सरपंचांनी केला.

यादीतून अनेकांची नावे गायब 
मतदार यादीत नाव नसल्याने तर काहींची नावे इतरत्र ठिकाणी असल्याने अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. तीसगाव येथील सरोजिनी बढे, अतुल बढे, संजय पाटील, वडगाव कोल्हाटी येथील आशा साळवे, सुनीता चव्हाण यांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याने त्यांना मतदान करता आले नाही. अशा अनेक मतदारांना ओळखपत्र असूनही मतदान केंद्रावर आल्यावर केवळ यादीत नाव नसल्याने मतदान न करताच घरी जावे लागल्याचे चित्र वाळूज महानगर परिसरात दिसून आले. 

ईडीसी न मिळाल्यामुळे मतदानापासून वंचित 
इलेक्शन ड्यूटी सर्टिफिकेट  (ईडीसी) न मिळाल्यामुळे अनेक सरकारी कर्मचारी मतदानापासून वंचित राहिले. मतदारसंघ बदलल्यामुळे काही कर्मचाऱ्यांना ईडीसी मिळाले नाही. परिणामी त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. ईडीसी भरून घेतल्यानंतर १२ (ड) अर्ज मिळतो, तो अर्जही मतदारांना मिळाला नाही. याप्रकरणी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले. शासकीय कर्मचाऱ्यांचे ईडीसी प्रशिक्षणादरम्यान भरून घेण्यात आले होते. ५५०० कर्मचाऱ्यांना ते देण्यात आले होते. शहर पोलिसांसह इतर कर्मचाऱ्यांसाठी ईडीसी दिले होते. ईडीसीआधारे कुठल्याही मतदान केंद्रांवर संबंधित मतदाराला मतदान करता येणे शक्य होते. बीएलओकडे ईडीसी जमा करून मतदानाचा हक्क बजावता येतो. काही ठिकाणी ईडीसी न मिळाल्याच्या तक्रारी होत्या, याबाबत जिल्हाधिकारी म्हणाले, ठराविक तक्रारी माझ्यापर्यंत आल्या नाहीत. 

सोशल मीडियातून गोपनीयतेचा भंग
सोशल मीडियातून अनेक मतदारांनी कुणाला मतदान केले, त्याची माहिती फेसबुकवर टाकून मतदान गोपनीयतेचा भंग केला. जिल्हा व राज्य पातळीवरील समितीकडे याबाबत माहिती देण्यात आली आहे. ज्यांनी मतदान गोपनीयतेचा भंग केला, त्यांना सोशल मीडियातून ट्रेस करून त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल. तत्पूर्वी, समितीमार्फत याबाबत चौकशी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. 

Web Title: Lok Sabha Election 2019: many voter unable to cast votes due to delete mark on electoral roll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.