सर्वांचीच दारोमदार मतविभागणीवर, महायुती, महाविकास आघाडी आणि एमआयएमचेही सारे लक्ष ‘वंचित’कडे

By शांतीलाल गायकवाड | Published: May 3, 2024 09:20 AM2024-05-03T09:20:59+5:302024-05-03T09:21:15+5:30

शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला हा मतदारसंघ उभ्या फुटीमुळे यावेळेस शिवसेना विरुद्ध  शिवसेना असे युद्ध लढणार आहे. महाविकास आघाडीतील उद्धवसेनेने सतत सहाव्यांदा चंद्रकांत खैरे यांनाच  पसंती दिली आहे.

lok sabha election 2024 Three candidates are contesting in Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha constituency | सर्वांचीच दारोमदार मतविभागणीवर, महायुती, महाविकास आघाडी आणि एमआयएमचेही सारे लक्ष ‘वंचित’कडे

सर्वांचीच दारोमदार मतविभागणीवर, महायुती, महाविकास आघाडी आणि एमआयएमचेही सारे लक्ष ‘वंचित’कडे

शांतीलाल गायकवाड

छत्रपती संभाजीनगर : राज्याची पर्यटन राजधानी व मराठवाड्याची राजधानी औरंगाबादेत तुल्यबळ  उमेदवारांचे भवितव्य मतविभागणी कशी होते, यावर ठरणार आहे.  महायुती, महाविकास आघाडी व ‘एमआयएम’चे उमेदवार  जीवतोड मेहनत करीत असले तरी बहुतेक उमेदवाराने  प्रतिस्पर्ध्यांची मते विभाजीत करण्यासाठी मोठ्या संख्येने ‘मतकटवे’ उभे केलेत. त्यामुळे एकूण उमेदवारांची संख्या तब्बल ३७ वर पोहोचली असून आतापर्यंतच्या  निवडणुकीतील हा उच्चांक ठरला.

शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला हा मतदारसंघ उभ्या फुटीमुळे यावेळेस शिवसेना विरुद्ध  शिवसेना असे युद्ध लढणार आहे. महाविकास आघाडीतील उद्धवसेनेने सतत सहाव्यांदा चंद्रकांत खैरे यांनाच  पसंती दिली आहे. गेल्या निवडणुकीचा (२०१९) अपवाद वगळता सतत चार वेळेस या मतदारसंघातून खैरे  यांनी विजयश्री प्राप्त केली.

प्रचारात गाजत असलेले मुद्दे

            ‘मंदिरवाला पाहिजे की, दारूवाला’ ही घोषणाच खैरे यांचे कार्यकर्ते देत आहेत.

            खैरे या मतदारसंघातून सतत चार वेळेस खासदार होते. त्यांनी विकासाऐवजी मंदिराच्या वाऱ्या केल्याच्या तक्रारी अधिक आहेत.

            शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कोणीच  सोडवू शकले नाही, अशी सार्वत्रिक तक्रार आहे.

नेत्यांची प्रतिष्ठा पणाला...

 महायुतीकडून राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, शिंदेसेनेचे प्रवक्ते आ. संजय शिरसाट, आ. रमेश बोरनारे यांची प्रतिष्ठा पणाला लागली  आहे.

 चंद्रकांत खैरे यांच्या विजयासाठी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे प्रयत्नशील आहेत. खैरेंच्या विजयामुळे त्यांचे नेतृत्व झळाळून निघेल.

 जलील यांच्यासाठी पक्षप्रमुख असदोद्दीन ओवेसी यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

दोन दशकांपासून औरंगाबादचा पाणीप्रश्न गाजतो आहे; परंतु अद्यापही औरंगाबादकरांना आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा.

औरंगाबादेत डीएमआयसी येऊन एक दशक झाले. या वसाहतीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध; परंतु एकही अँकर प्रोजेक्ट नाही.

चंद्रकांत खैरे चार वेळेस या मतदारसंघाचे खासदार राहिले; परंतु त्यांना मतदारसंघाचा विकास करता आला नाही.

संदीपान भुमरे हे मतदारसंघाबाहेरचे असून त्यांनी त्यांचा दारू व्यवसाय प्रारंभी लपविल्याने प्रचारात आली दारू.

२०१९ मध्ये काय घडले ?

इम्तियाज जलील        एमआयएम (विजयी)     ३,८९,०४२

चंद्रकांत खैरे     (शिवसेना)      ३,८४,५५०

हर्षवर्धन जाधव  ( अपक्ष )       २,८३,७९८

२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?

वर्ष     विजयी उमेदवार पक्ष    टक्के

२०१४   चंद्रकांत खैरे     शिवसेना ५३.०३

२००९   चंद्रकांत खैरे     शिवसेना ४२.०८

२००४   चंद्रकांत खैरे     शिवसेना ५२.०४

१९९९   चंद्रकांत खैरे     शिवसेना ४२.३

१९९८   रामकृष्ण बाबा पाटील    काँग्रेस  ४९.५

कुणाकडे किती पाठबळ?

            भुमरे यांच्या मागे भाजपसह शिंदेसेना व अजित पवार गटाचे पाठबळ आहे.

            खैरे यांच्या मागे शिवसेनेचे संघटनात्मक बळ मोठे आहे.

            खा. इम्तियाज जलील यांनी नशेखोरी, आदर्श बँक घोटाळ्यात घेतलेल्या पुढाकाराने गुंतवणूकदार पाठीशी.

एकूण मतदार    २०,६१,२२०

१०,७७,८०९

पुरुष

९,८१,७७३

महिला

१२८ इतर

Web Title: lok sabha election 2024 Three candidates are contesting in Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.