औरंगाबाद येथे होणार लोकांगण महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 12:42 AM2017-09-20T00:42:37+5:302017-09-20T00:42:37+5:30
ज्येष्ठ पत्रकार पी.जी.शिंदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रोटरी क्लब औरंगाबादच्या वतीने १ आॅक्टोबर रोजी औरंगाबाद येथील संत एकनाथ रंगमंदिरात विभागीय लोकांगण महोत्सव आयोजित केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : ज्येष्ठ पत्रकार पी.जी.शिंदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रोटरी क्लब औरंगाबादच्या वतीने १ आॅक्टोबर रोजी औरंगाबाद येथील संत एकनाथ रंगमंदिरात विभागीय लोकांगण महोत्सव आयोजित केला आहे.
लोककलांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पोवाडा, भजन, कीर्तन, भारुड, लावणी, बतावणी, वाघ्या-मुरळी, गोंधळ, जागरण, पांगूळ, पोतराज, दशावतार, वासुदेव, बहुरुपी, दंडार, कुडमुडे जोशी, कोव्या, मसनजोगी, गवळण आदी कलांचे अस्तित्व कायम राखण्यासाठी प्रा.मिलिंद साळवी व प्रशांत शिंदे यांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. उत्कृष्ट सादरीकरण सादर करणाºया संचाला १० हजार रुपयांपासून ते २ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर मदत केली जाणार आहे.
जिल्ह्यातील लोककलावंतांनी समन्वयक बाबूराव केळकर, शाहीर मधुकर पाटील यांच्याकडे नाव नोंदणी, असे आवाहन लोकांगण महोत्सव समितीने केले आहे.