लोकमत इफेक्ट: एन-४ मधील रस्त्याच्या कामाला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:05 AM2021-05-09T04:05:17+5:302021-05-09T04:05:17+5:30
अशी बातमी लोकमतमध्ये प्रकाशित झाल्यानंतर येथील रस्त्याच्या कामाला वेग आलेला आहे. सारस्वत बँकेसमोरील सिमेंट रस्त्यांचे काम रखडलेले होते. ...
अशी बातमी लोकमतमध्ये प्रकाशित झाल्यानंतर येथील रस्त्याच्या कामाला वेग आलेला आहे.
सारस्वत बँकेसमोरील सिमेंट रस्त्यांचे काम रखडलेले होते. लोकमतच्या बातमीमुळे दुसऱ्या दिवशीच रस्त्याचे काम सुरू झाले.
रस्त्याच्या दुतर्फा सिमेंटचे पाइप टाकलेले होते. त्यामुळे रस्त्यावर छोटे मोठे अपघात होत होते. बातमी प्रसिद्ध झाली की दुसऱ्याच दिवशी जेसीबीच्या सहाय्याने सगळे पाइप उचलून दूर नेऊन ठेवले गेले.
वाहतुकीसाठी संपूर्ण रस्ता रिकामा करण्यात आला. रस्त्याच्या दुतर्फा खड्डे खोदून ठेवलेले होते.
त्या खड्ड्यांच्या वर बांधकाम करण्यात आले. छोटे हौदही बांधले जाऊन त्यावर लगेचच ढापेही ठेवण्यात आलेले आहेत.
पाण्याच्या समस्येविषयी माजी नगरसेविका माधुरी अदवंत म्हणाल्या, या समस्येसाठी येथील नागरिकांनी एक दिवस मनपासमोर आंदोलन केले. आमचाही पाठपुरावा सुरुच आहे.
दैनिक लोकमतच्या बातमीची दखल घेऊन नागरी समस्या मार्गी लागत आहेत, हे पाहून एन-४ सिडको परिसरातील नागरिकांनी दैनिक लोकमतचे अगदी मनापासून आभार मानले आहेत.