लोकमत महामॅरेथॉन : तुम्हीही होऊ शकता सहभागी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 01:12 AM2017-12-15T01:12:38+5:302017-12-15T01:12:42+5:30
संपूर्ण औरंगाबाद शहराला ज्या स्पर्धेचे वेध लागलेले आहेत ती ‘लोकमत महामॅरेथॉन’ स्पर्धा अवघ्या दोन दिवसांवर आली आहे. रविवारी (दि.१७) सकाळी सहा वाजता सुरू होणाºया या स्पर्धेसाठी हजारो धावपटूंनी गेल्या महिनाभरापासून तयारी सुरू केलेली आहे. प्रत्यक्ष मॅरेथॉनमध्ये धावून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी हे धावपटू सज्ज झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : संपूर्ण औरंगाबाद शहराला ज्या स्पर्धेचे वेध लागलेले आहेत ती ‘लोकमत महामॅरेथॉन’ स्पर्धा अवघ्या दोन दिवसांवर आली आहे. रविवारी (दि.१७) सकाळी सहा वाजता सुरू होणाºया या स्पर्धेसाठी हजारो धावपटूंनी गेल्या महिनाभरापासून तयारी सुरू केलेली आहे. प्रत्यक्ष मॅरेथॉनमध्ये धावून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी हे धावपटू सज्ज झाले आहेत.
मात्र, लोकमतच्या पुढाकाराने सॅफ्रॉन लॅण्डमार्क प्रस्तुत महामॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी न होऊ शक लेल्या शहरवासीयांनी नाराज होण्याचे कारण नाही. कारण, तुम्हीदेखील या स्पर्धेत तेवढ्याच हिरीरीने सहभागी होऊ शकता. कारण ही स्पर्धा औरंगाबादच्या प्रत्येक नागरिकाची आहे.
मॅरेथॉनमध्ये धावण्याबरोबरच या धावपटूंचा उत्साह वाढविणे हेसुद्धा मॅरेथॉनचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे आणि तो संपूर्ण शहराला पूर्ण करायचा आहे. या स्पर्धेत आपलाही सक्रिय सहभाग असणे फार आवश्यक आहे. तो कसा घ्यायचा यासाठी काही ‘आयडिया’ येथे देत आहोत.
जे तरुण काही कारणास्तव मॅरेथॉनमध्ये धावणार नसतील त्यांनी घरी शांत बसू नये. युवक-युवती चेहºयावर रंग लावून, फेटे बांधून, आकर्षक पेहराव करून मार्गावर येऊ शकतात. तारुण्याचा सळसळता जोम धावण्याबरोबरच प्रोत्साहन देण्यातही दिसावा.
गेल्या वर्षीच्या मॅरेथॉन स्पर्धेला शहरवासीयांना जसा भरभरून प्रतिसाद दिला तो कौतुकास्पद होता. पहिल्याच वर्षी औरंगाबादकरांचे मनापासून प्रेम मिळाल्याने पहिली लोकमत मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी
ठरली.
तर मग औरंगाबादकरांनो रविवारी सकाळी आळस न करता घराबाहेर येऊन मॅरेथॉन रनर्सना मनापासून ‘चिअर अप’ करा. कारण ‘मी धावतोय शहरासाठी, शहर धावतेय माझ्यासाठी’ हे विधान आपल्याला खरे करून दाखवायचे आहे.
औरंगाबादकरांनो, वाढवा धावपटूंचा उत्साह
जे शहरवासी धावणार नसतील ते आपल्या घराबाहेर येऊन मॅरेथॉन मार्गावर उभे राहून धावणाºयांचा उत्साह वाढवू शकतात. तुमच्या प्रोत्साहनाचे शब्द धावपटूंचा उत्साह आणि ऊर्जा द्विगुणित करतील. त्यांना छोट्या-छोट्या पेपर ग्लासमध्ये सॉफ्ट ड्रिंक, ज्यूस, लिंबू सरबत असे पेयसुद्धा आपण देऊ शकता.
विशेषत: शाळकरी मुलांनी व्यायाम आणि आरोग्याची प्रेरणा घेण्यासाठी सकाळी लवकर उठून मॅरेथॉन मार्गावर हजर राहून मोठ्या उत्साहात धावपटूंचे मनोबल वाढवावे. तुमच्यासोबत आपल्या कुटुंबाला आणि मित्र परिवारालाही सोबत आणा. पालकांनीदेखील आवर्जून मुलांना घेऊन यावे.
रांगोळी स्पर्धा :
प्रथम बक्षीस ५ हजार रुपये
रांगोळीचे आपल्या संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून मॅरेथॉनपटूंच्या स्वागतासाठी आपणही मॅरेथॉन मार्गाच्या कडेला आकर्षक रांगोळी काढून सजावट करून शकता. रांगोळीतून आरोग्य आणि सामाजिक संदेश दिला तर अधिकच उत्तम. रविवारी सकाळी मॅरेथॉन मार्गापाशी काढलेल्या तीन सर्वोत्तम रांगोळींना अनुक्र मे ५ हजार, ३ हजार आणि २ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. विजेत्यांची नावे ‘लोकमत’च्या अंकात प्रसिद्ध केली जातील.
पोस्टर स्पर्धा :
प्रथम बक्षीस ३ हजार रुपये
शालेय विद्यार्थ्यांनाही आकर्षक बक्षीस जिंकण्याची संधी आहे. ‘ए-३’ आकाराच्या कागदावर शाळकरी मुलांनी विविध सामाजिक संदेश देणारे पोस्टर्स तयार करून ते मॅरेथॉन मार्गावर दर्शनीय भागावर लावावेत. ‘लोकमत’ टीमतर्फे त्यांची पाहणी करून तीन सर्वोत्तम पोस्टर्सची निवड केली जाईल. विजेत्यांना अनुक्रमे ३ हजार, २ हजार आणि १ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल.
मॅरेथॉन मार्गावर ढोल-ताशा, गाणे-संगीत वाजवून, लेझीम खेळून जल्लोषपूर्ण वातावरण तयार करू शकता. सकाळच्या गुलाबी थंडीत धमाल मस्तीवाला ‘माहौल’ असेल तर मॅरेथॉनपटूंचेही पाय तेजीने धावू लागतील. तसेच यानिमित्त बाहेरून येणाºया धावपटूंना औरंगाबादकरांचे आदरातिथ्य अनुभवण्याची संधी मिळेल.