लोकमत महामॅरेथॉनचा धडाका डिसेंबरपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 02:20 AM2018-09-09T02:20:19+5:302018-09-09T02:20:31+5:30
अनेक सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या आणि अनेक प्रतिभावान खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देणा-या लोकमत समूहातर्फे गतवर्षी जबरदस्त यशानंतर यंदा ‘लोकमत महामॅरेथॉन’चा धडाका डिसेंबर महिन्यापासून सुरू आहे.
औरंगाबाद : अनेक सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या आणि अनेक प्रतिभावान खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देणा-या लोकमत समूहातर्फे गतवर्षी जबरदस्त यशानंतर यंदा ‘लोकमत महामॅरेथॉन’चा धडाका डिसेंबर महिन्यापासून सुरू आहे. लोकप्रियतेचे यशोशिखर गाठणाºया महामॅरेथॉनची सुरुवात नाशिक येथे २ डिसेंबरपासून होत आहे. त्यानंतर औरंगाबादला १६ डिसेंबरला, कोल्हापूरला ६ जानेवारी, नागपूरला ३ फेब्रुवारी आणि पुणे येथे १७ फेब्रुवारी होणार आहे.
गतवर्षी चार शहरांत आयोजित महामॅरेथॉनला जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. या महामॅरेथॉनमध्ये खेळाडूप्रमाणेच ज्येष्ठ नागरिक, महिला, युवा आणि महत्त्वाचे म्हणजे परदेशातील धावपटूही सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे महामॅरेथॉनच्या मेडलवर आयोजित करण्यात
आलेल्या त्या-त्या शहराचा नकाशा असणार आहे. औरंगाबादमध्ये महामॅरेथॉन जिंकल्यास त्या मेडलवर औरंगाबादचा नकाशा असेल. धावपटूने पाचही शहरांतील मॅरेथॉन पूर्ण करून मिळालेले मेडल्स जुळवल्यास ‘महाराष्ट्राचा’ नकाशा बनणार आहे, तसेच पाचही महामॅरेथॉन जिंकून हे मेडल्स पटकाविणारा धावपटू महामॅरेथॉनर ठरणार आहे.
गतवर्षीच्या ‘लोकमत समूहा’तर्फे महाराष्ट्रातील चार मोठी शहरे नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर आणि नागपूर येथे महामॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी मिळालेला जबरदस्त प्रतिसाद पाहता आयोजकांनी या वेळेस १७ फेब्रुवारी रोजी पुणे येथेही महामॅरेथॉन आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या चार महामॅरेथॉनमध्ये तब्बल २२ हजारांपेक्षा जास्त धावपटू सहभागी झाले होते.
या वेळेस पुण्याचाही समावेश झाला आहे. त्यामुळे सहभागी धावपटूंचा आकडा हा २५ हजारांपेक्षा जास्त अपेक्षित आहे. ‘रनिंग’ संस्कृती देशात वेगाने वाढत आहे आणि महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही.
महाराष्ट्रातील नागरिक तंदुरुस्त राहावे या हेतूने आयोजित महामॅरेथॉन ही ‘फन रन’ (१२ वर्षांपेक्षा
जास्त, धावण्याचा छंद असणाºयांसाठी), १0 कि.मी.ची
पॉवर रन (१६ पेक्षा जास्त
वर्षांवरील) आणि २१ कि. मी. (१८ पेक्षा जास्त) असणार आहे. त्यात फॅमिली रन ही ३ कि.मी. अंतराची असणार आहे. ती सर्वांसाठी खुली असेल. त्याचप्रमाणे लष्करातील धावपटूंसाठी वेगळा गट ठेवण्यात आला आहे. आयोजकांना ही महामॅरेथॉन यशस्वी होईल, असा पूर्ण विश्वास आहे.
>‘लोकमत महामॅरेथॉन’च्या संस्थापिका रुचिरा दर्डा यांनी ही महामॅरेथॉन वैयक्तिक सहनशक्तीची चाचणी घेण्याची संधी असेल, असे सांगितले.
त्या म्हणाल्या की, ‘खेळाडूंनी फिटनेसवर प्रभावीपणे लक्ष केंद्रित करावे हा या महामॅरेथॉनचा हेतू असून, ‘लोकमत महामॅरेथॉन’चा प्रत्येक शिस्तबद्ध धावपटूने एक मैलाचा दगड पार करावा, असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या महामॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
‘लोकमत समूहा’चे सामाजिक आणि क्रीडा विभागात मोलाचे योगदान आहे. ‘लोकमत समूहा’ने नेहमीच खेळाडूंच्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळावे या हेतूने नेहमीच व्यासपीठ निर्माण करून दिले आहे.
‘लोकमत समूह’ महामॅरेथॉनचे आयोजन करून ‘धावण्याची संस्कृती विकसित’ करीत आहे.
>नाव नोंदणीस प्रारंभ
सीझन १ ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता पुन्हा एकदा अख्खा महाराष्ट्र मॅरेथॉनमय होणार... तुम्हीही व्हा! लोकमत महामॅरेथॉन सीझन २ साठी आज रजिस्टर करा. नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर शहरांचं एक सर्किट पदकासह...
>पुणे महामॅरेथॉनचे पदक ठरणार मेगा आकर्षण
औरंगाबाद, नाशिक, नागपूर, कोल्हापूर या चार प्रमुख शहरांच्या प्रवासानंतर आता ‘लोकमत समूहा’तर्फे १९ फेब्रुवारी रोजी पुणे येथेही महामॅरेथॉनचे आयोजन करण्यात येणार आहे.
‘महा टॅग पदक’ हेच महामॅरेथॉनचे खरे आकर्षण असणार आहे. पुण्यात नंबर १ असलेल्या ‘लोकमत’तर्फे आयोजित महामॅरेथॉननिमित्त धावपटूंसाठी लिमिटेड एडिशन मेडल उपलब्ध करून देताना आयोजक म्हणून आम्हास आनंद होत आहे.
या महामॅरेथॉनमध्ये नाव नोंदविण्यास धावपटूंमध्ये प्रचंड उत्साह आहे. महाराष्ट्रातील इच्छुक धावपटूंनी सहभागासाठी आपल्या स्थानिक लोकमत जिल्हा कार्यालयातील इव्हेंट विभागात संपर्क साधावा. अधिक माहिती आणि आॅनलाईन नावनोंदणीसाठी www.mahamarathon.com या संकेतस्थळास भेट द्यावी.