‘लोकमत प्रॉपर्टी शो २०२०’चा उद्या होणार भव्य शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 07:47 PM2020-02-20T19:47:13+5:302020-02-20T19:48:55+5:30
औरंगाबादमध्ये तुमचे हक्काचे घर शोधणे आता होणार सोपे
औरंगाबाद : मेट्रोसिटीकडे वेगाने वाटचाल करणाऱ्या औरंगाबाद शहरात आपले स्वत:चे घरकुल असावे, असे स्वप्न पाहणारे आज अनेक जण आहेत. घर तर घ्यायचे आहे; पण कधी, कसे आणि कुठे शोधावे, अर्थसाहाय्य कसे मिळवावे, वेगवेगळ्या बिल्डर्सची माहिती कशी घ्यावी, याविषयी अनेकांना माहिती नसते. उद्यापासून सुरू होणाऱ्या ‘लोकमत प्रॉपर्टी शो-२०२०’मध्ये तुमच्या मनातील याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत आणि औरंगाबादमध्ये तुमचे हक्काचे घर शोधणे आता अधिकच सोईस्कर होणार आहे.
लोकमत भवन येथे शुक्रवार, दि.२१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान ‘लोकमत प्रॉपर्टी शो-२०२०’चे भव्य तीनदिवसीय आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून, शहरातील नामांकित बिल्डर्स, बांधकाम क्षेत्रातील उत्पादक , अर्थसाहाय्य करणाऱ्या विविध संस्था, बँका यांचाही या प्रदर्शनात सहभाग असणार आहे. यावर्षीच्या गुढीपाडव्याला आपल्या हक्क ाचे घर बुक करण्याचे स्वप्न बघत असाल, तर तुमचे हे स्वप्न महाशिवरात्रीलाच पूर्णत्वास येऊ शकते. कारण या भव्य प्रदर्शनाच्या माध्यमातून गुढीपाडव्याच्या आॅफर्स आता महाशिवरात्रीलाच मिळणार आहेत. बंगलोज, रोहाऊसेस, लक्झरी फ्लॅटस्, शोरूम्स, शॉप्स, आॅफिसेस, पेंटहाऊस, फार्महाऊस, ओपन प्लॉटस् यापैकी काहीही घ्यायचे असेल, तर असंख्य पर्याय एकाच छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्या.
वेळ, पैसा आणि श्रमाचीही बचत
वेगवेगळ्या बिल्डर्सची कार्यालये, गृहप्रकल्प कोठे सुरू आहेत. याबाबत अनेकदा सर्वसामान्यांना माहिती नसते. ही माहिती घेऊन संपूर्ण शहरात फिरून येथील नामांकित बिल्डर्सचे विविध गृहप्रकल्प पाहण्यात वेळ, पैसा आणि श्रम लागतात. लोकमत प्रॉपर्टी शो-२०२० मध्ये सर्व बिल्डर्सचे गृहप्रकल्प, बांधकामासंदर्भातील सविस्तर माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रमाचीही बचत होणार आहे.
प्रदर्शनातील नामांकित बांधकाम व्यावसायिक व वित्तसंस्था
प्राईड ग्रुप, प्रीतांश रिअॅलिटी, ओशन रिअलटर्स इंडिया, फे थ बिल्ड, सारा ग्रुप, नाथ डेव्हलपर्स, आॅराकॉन व्हेंचर्स, कल्याण ग्रुप, स्टेट बँक आॅफ इंडिया, साई डेव्हलपर्स, राज ग्रुप, ओअॅसिस लॅण्डमार्क, नभराज ग्रुप, सिंडिकेट बँक, आर्च डेव्हलपर्स, श्री साई समर्थ डेव्हलपर्स, विकास डेव्हलपर्स, नागपाल ग्रुप, ज्योती बिल्डर्स, एचडीएफसी लि., फिटनेस वर्ल्ड, पॉझिटिव्ह वास्तू निवारण.
वास्तुशास्त्रविषयक कार्यशाळा
तुमची वास्तू कशी असावी, दरवाजे क ोठे असावेत, कोणती वस्तू कोठे ठेवावी, याची पुरेपूर माहिती वास्तुशास्त्रात दिलेली आहे. हे वास्तुशास्त्र जाणून घेण्याची संधी तुम्हाला लोकमत प्रॉपर्टी शोमध्ये मिळणार आहे. ज्योतिषाचार्य वास्तुशास्त्रज्ञ अनंत पांडव गुरुजी रविवार, दि.२३ फेब्रुवारी रोजी सायं. ५ ते ६ या वेळेत आयोजित कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन करतील.