'जावई म्हणे अस्सं सासर सुरेख बाई' स्पर्धा; व्हिडीओ पाठवा बक्षीस जिंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 08:41 PM2021-01-18T20:41:50+5:302021-01-18T20:51:28+5:30

लोकमत सखी मंच आणि सोनी मराठी आयोजित स्पर्धा

lokmat sakhi manch organised javai mhane as sasar surekh bai contest | 'जावई म्हणे अस्सं सासर सुरेख बाई' स्पर्धा; व्हिडीओ पाठवा बक्षीस जिंका

'जावई म्हणे अस्सं सासर सुरेख बाई' स्पर्धा; व्हिडीओ पाठवा बक्षीस जिंका

googlenewsNext

औरंगाबाद : सोनी मराठीवरील ' अस्स माहेर नको ग बाई' या लोकप्रिय मालिकेतील कलाकारांना प्रत्यक्ष भेटण्याची  व बक्षीस जिंकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे, हे वाचल्यावर तुम्हाला विश्वास बसला नसेल पण हे सत्य आहे.

लोकमत सखीमंच व सोनी मराठी 'अस्स माहेर नको ग बाई' आयोजित जावई म्हणे अस्स सासर सुरेखबाई' ही आगळी वेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

महिलांना त्यांचे सासर हा जसा कौतुकाचा विषय असतो, तसेच अनेक पुरुषांसाठीही त्यांचे सासर ही एक आनंदाची ठेव असते. म्हणूनच तर सासरी रमणारे आणि सासू,सासरे, मेव्हणा, मेव्हणी ही प्रत्येक नाती मनापासून जपण्याचा प्रयत्न अनेक पुरुषांकडून केला जातो. अशाच तुमच्याही काही आठवणी आम्हाला आवर्जून सांगा.

यात सहभागी होण्यासाठी सखींना काय करायचे आहे ,तर तुमच्या माहेरच्यांशी असलेले तुमच्या नवऱ्याचे नाते कसे आहे त्या  आठवणीं तुम्हीच  शब्दबद्ध (१००/१५० शब्दांत) करायचा आहेत किंवा एक ते दीड मिनिटाचा व्हिडीओ तयार करा. व्हिडीओ किंवा लेखी स्वरूपात आठवणी पाठविण्यासाठी ___ या नंबरवर व्हाट्सएप्प करावा. शेवटचीतारीख १८ जानेवारी आहे.

सर्व येणाऱ्या आठवणीतून सर्वोत्कृष्ट आठवण किंवा व्हिडीओला मिळेल ऑनलाईन कार्यक्रमात सोनी मराठी वरील आपल्या लाडक्या कलाकारांना भेटण्याची संधी.

स्वानंदी टिकेकर, पुष्कराज चिरपुटकर, यशोमान आपटे, रूपलनंद, पल्लवी पाटील, अमृता पवार या लोकप्रिय कलाकारांना प्रत्यक्ष भेटण्याची आणि बक्षीस जिंकण्याची संधी. मग विचार कसला करता वेळ कमी आहे.  आठवणी शब्दबद्ध करा, व्हिडिओ पाठवा आणि भाग्यवान विजेत्या बना.

लोकमत फेसबुकवर ऑनलाईन कार्यक्रमाचा लुटा आनंद
लोकमत सखी मंच आणि सोनी मराठी ' अस्स माहेर नको ग बाई' आयोजित ' जावई म्हणे अस्स सासर सुरेखबाई' स्पर्धेनिमित 22 जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता लोकमतच्या फेसबुक पेजवर ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सखींना ऑनलाईन कार्यक्रमाचा घरबसल्या आनंद लुटावा,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Web Title: lokmat sakhi manch organised javai mhane as sasar surekh bai contest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.