शेतकऱ्यांसाठी ‘लोकमत’ची ‘हेल्पलाईन’

By Admin | Published: September 10, 2015 12:06 AM2015-09-10T00:06:26+5:302015-09-10T00:33:21+5:30

बीड : दुष्काळसदृश्य परिस्थिती, शासन, प्रशासन आपली भूमिका बजावत आहे. मदतीसाठी सर्वजण कटीबद्ध आहेत. ‘लोकमत’ने देखील सामाजिक बांधिलकी जपत ‘हेल्पलाईन’च्या माध्यमातून

Lokmat's helpline for farmers | शेतकऱ्यांसाठी ‘लोकमत’ची ‘हेल्पलाईन’

शेतकऱ्यांसाठी ‘लोकमत’ची ‘हेल्पलाईन’

googlenewsNext


बीड : दुष्काळसदृश्य परिस्थिती, शासन, प्रशासन आपली भूमिका बजावत आहे. मदतीसाठी सर्वजण कटीबद्ध आहेत. ‘लोकमत’ने देखील सामाजिक बांधिलकी जपत ‘हेल्पलाईन’च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणींना वाचा फोडण्याचे निश्चित केले आहे.
अन्न सुरक्षा योजनेंतर्गत शेतकरी, शेतमजुरांना ३ रु. दराने तांदूळ व २ रु. किलो दराने गहू तसेच मागेल त्याला शेततळे देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. मनरेगाच्या माध्यमातून जिल्ह्यात सुमारे २ लाख लोकांना रोजगार उपलब्ध करण्याचे आश्वासन आहे. भविष्यात शैक्षणिक शुल्क माफी, वीज बिल भरण्याचेही शासनाचे धोरण आहे. शेतकऱ्यांसाठी अशा घोषणा आणि प्रत्यक्षात अशा योजनाही आहेत. मात्र त्याच्या अंमलबजावणीत वा थेट लाभ मिळण्यात येत असलेल्या अडचणी आम्हाला जरुर कळवा, शिवाय आपल्या गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या मांडा, टँकर किती वेळा येते? ते कळवा यासंपूर्ण समस्यांचा गोषवारा आम्ही बातमी स्वरुपात मांडू. प्रशासनाची बाजू समजून घेऊन आमचे प्रतिनिधी समस्या सोडविण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील. आपल्यासाठी खालील क्रमांकावर हेल्पलाईन सुरू आहे. आपण लोकमतच्या प्रतिनिधींशी ९५५२५५३३४७, ९५५२५५३३६१ या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधू शकता.
दुष्काळाविरुद्ध लढणारे बहाद्दर शेतकरी आणि त्यांना साथ देणारी सेवावृत्तीचे माणसे आणि संस्थांचीही दखल ‘लोकमत’मधून घेतली जाईल. स्वत:चे पीक मोडून गावाला पाणी देणारे शेतकरी, टंचाईच्या झळा कमी करण्यासाठी सरसावलेले शिक्षक व त्यांनी सुरू केलेले टँकर अशा अनेक उजव्या बाजू समाजात आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना, दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांना मदतीसाठीही पुढे येणारे हात आहेत. अशांनाही आपला कार्यवृत्तांत वरील मोबाईल क्रमांकावर जरुर कळवावा.

Web Title: Lokmat's helpline for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.