साखळी पद्धतीने केली लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:02 AM2017-09-30T00:02:01+5:302017-09-30T00:02:01+5:30

येथील महानगरपालिकेच्या रक्कमेतून ७६४ खाजगी व्यक्तींची वीज बिले भरुन ७१ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येऊ लागली असून गेल्या ३० महिन्यांत साखळी पद्धतीने अनेकांच्या सहाय्याने मनपाच्या पैशांची लूट केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Looted the chain | साखळी पद्धतीने केली लूट

साखळी पद्धतीने केली लूट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील महानगरपालिकेच्या रक्कमेतून ७६४ खाजगी व्यक्तींची वीज बिले भरुन ७१ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येऊ लागली असून गेल्या ३० महिन्यांत साखळी पद्धतीने अनेकांच्या सहाय्याने मनपाच्या पैशांची लूट केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जून २०१५ ते आॅगस्ट २०१७ या ३२ महिन्यांपैकी ३० महिने महानगरपालिकेने वीज बिलापोटी महावितरणला ८ कोटी ७२ लाख ३२ हजार ४०० रुपये दिले. त्यापैकी ७१ लाख २९ हजार ६७ रुपयांच्या रक्कमेतून ७६४ खाजगी ग्राहकांची वीज बिले भरल्या प्रकरणी मनपाचे सहाय्यक अ.जावेद अ.शकुर व महावितरणमधील वरिष्ठ तंत्रज्ञ राजेश सटवाजी घोरपडे यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. आता या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु झाला आहे. मुळात या प्रकरणाची खोलावर जावून माहिती घेतली असता महानगरपालिकेचा निष्काळजीपणा याला कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. महानगरपालिकेचे विद्युत पथदिव्यांचे २६७ मीटर आहेत. याशिवाय इतरही काही मीटर आहेत. या मीटरच्या नोंदीनुसार वीज वापराची बिले मनपा आरटीजीएसच्या माध्यमातून महावितरणकडे भरते. प्रत्येक मीटरचे वीज बिल भरल्यानंतर महावितरणकडून त्याची पावती दिली जाते. या प्रकरणात मात्र एकीकडे मनपातील एक कर्मचारी व दुसरीकडे महावितरणमधील एक कर्मचारी या दोघांनी मिळून मनपाच्या जेवढ्या मीटरचे वीज बिल भरण्यासाठी रक्कम आरटीजीएस झाली तेवढी रक्कम न भरता काही मीटरचे वीज बिल बाजूला ठेवले व त्या बदल्यात खाजगी व्यक्तीच्या मीटरचे वीज बिल भरले. ही प्रक्रिया गुन्हा दाखल झालेल्या दोघांकडून सुरु असताना मनपातील संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी एकूण मीटरपैकी किती मीटरची वीज बिले भरली, कितीच्या पावत्या जमा केल्या, याची पडताळणी करणे आवश्यक होते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले गेले. शिवाय लेखा विभागातील संबंधित अधिकाºयांनीही या संदर्भात काळजी घेतली नाही.

Web Title: Looted the chain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.