‘त्या’ आदेशाला शाळांचा खो; फिस वसुली सुरूच
By Admin | Published: October 25, 2015 11:39 PM2015-10-25T23:39:35+5:302015-10-25T23:59:05+5:30
हसनाबाद : दुष्काळग्रस्त भागातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा फी माफीचा निर्णय राज्य शासनाने घेवून दुष्काळग्रस्ताना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
हसनाबाद : दुष्काळग्रस्त भागातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा फी माफीचा निर्णय राज्य शासनाने घेवून दुष्काळग्रस्ताना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र निर्णयाला अनेक शाळा व महाविद्यालयांनी खो देवून विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल केले जात आहे. त्यामुळे पालकवर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
सध्या शाळांमध्ये इयत्ता दहावी परिक्षेचे अर्ज भरण्यात येत आहे. त्यासोबत परिक्षा शुल्कही वसूल केले जात आहे. दहावीच्या मुलांकडून ४५० रूपये परिक्षा शुल्क वसूल करण्यात येत आहे. याकडे शिक्षण विभागाने लक्ष देवून शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या शांळा व महाविद्यालयांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)