ग्रा.पं.कर्मचा-यांच्या वेतनाला खो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 01:30 AM2017-12-03T01:30:51+5:302017-12-03T01:30:54+5:30
शासनाकडून यंदा ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या वेतनाची रक्कम तब्बल सहा ते सात महिने उशिराने जिल्हा परिषदेच्या खात्यावर जमा झाली असून, वित्त विभागाने सदरील रक्कम सर्व नऊ गटविकास अधिका-यांच्या खात्यांमध्ये वर्ग केली आहे. तथापि, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाºयांना आता नियमित वेतन मिळण्याची वाट मोकळी झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शासनाकडून यंदा ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या वेतनाची रक्कम तब्बल सहा ते सात महिने उशिराने जिल्हा परिषदेच्या खात्यावर जमा झाली असून, वित्त विभागाने सदरील रक्कम सर्व नऊ गटविकास अधिका-यांच्या खात्यांमध्ये वर्ग केली आहे. तथापि, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाºयांना आता नियमित वेतन मिळण्याची वाट मोकळी झाली आहे.
ग्रामविकास विभागाकडून दरवर्षी दोन टप्प्यांत ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या वेतनासाठी सहायक अनुदानाची रक्कम प्राप्त होत असते. साधारणपणे वेतनाचा पहिला टप्पा एप्रिल- मे महिन्यात प्राप्त होत असतो. यावर्षी तो सात महिन्यांनंतर अर्थात गेल्या आठ दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेला प्राप्त झाला. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या आदेशान्वये कर्मचाºयांच्या वेतनासाठी प्राप्त झालेल्या सहायक अनुदानाची ३ कोटी २५ लाख १२ हजार रुपयांची रक्कम सर्व गटविकास अधिकाºयांच्या खात्यावर जमा करण्यात आली. कर्मचाºयांच्या वेतनाचा सहायक अनुदानाचा दुसरा टप्पा महिनाभरात प्राप्त होऊ शकते.
प्राप्त ३ कोटी २५ लाख १२ हजार रुपयांपैकी औरंगाबाद तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या वेतनासाठी ४४ लाख ८५ हजार ८८४ रुपये, पैठण तालुक्यासाठी ३९ लाख ९८ हजार ९७५ रुपये, गंगापूर तालुक्यासाठी ४४ लाख ३८ हजार ९६१ रुपये, वैजापूर तालुक्यासाठी ४५ लाख ८० हजार ४०९ रुपये, कन्नड तालुक्यासाठी ४९ लाख ६० हजार ८९२ रुपये, सिल्लोड तालुक्यासाठी ४२ लाख ४६ हजार १७० रुपये, सोयगाव तालुक्यासाठी १७ लाख २० हजार १६१ रुपये, खुलताबाद तालुक्यासाठी १५ लाख ११ हजार ७२९ रुपये, फुलंब्री तालुक्यासाठी २५ लाख ६८ हजार ८१९ रुपये गटविकास अधिकाºयांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.
सदरील रक्कम ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या किमान वेतनासाठी खर्च करण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या सूचना आहेत.