पिकांवर ट्रॅक्टर फिरवूून केले दीड लाख रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:07 AM2017-07-20T00:07:21+5:302017-07-20T00:09:55+5:30

देवगावफाटा : शेतातील उभ्या पिकांवर ट्रॅक्टरचे रोटर फिरवून दीड लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

Loss of half a million rupees by turning tractors on crops | पिकांवर ट्रॅक्टर फिरवूून केले दीड लाख रुपयांचे नुकसान

पिकांवर ट्रॅक्टर फिरवूून केले दीड लाख रुपयांचे नुकसान

googlenewsNext

पिकांवर ट्रॅक्टर फिरवूून केले दीड लाख रुपयांचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क

देवगावफाटा येथील गट नं. १३६ मध्ये सावकारी पैशाच्या व्यवहारातून झालेल्या खरेदी खताचा वाद सावकाराची पत्नी सीमाबाई बोराडे व रेवण साळेगावकर यांच्यामध्ये न्यायालयात चालू आहे. या जमिनीवर रेवण शिवअप्पा साळेगावकर यांची वहिती व ताबा आहे. परंतु, सावकाराची पत्नी सीमा गुलाब बोराडे व शिवाजी झाकणे, मुक्ताबाई झाकणे यांची दोन मुले व ट्रॅक्टरचालकाने १२ जुलै रोजी रात्री ९ ते ११ च्या दरम्यान गट नं. १३६ मध्ये साळेगावकर यांचा मालकी व ताबा असलेल्या दोन हेक्टर शेत जमिनीत अनाधिकृत प्रवेश करून पेरणी केलेले सोयाबीन व तुरीच्या पिकांवर ट्रॅक्टरचे रोटावेटर फिरवून नुकसान केले आहे.
या नुकसानीबद्दल नागनाथ साळेगावकर यांच्या फिर्यादीवरून चारठाणा पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास चारठाणा येथील बीटजमादार राऊत हे करीत आहेत.

Web Title: Loss of half a million rupees by turning tractors on crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.