हजारो लिटर पाण्याची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:14 AM2017-11-01T00:14:38+5:302017-11-01T00:14:52+5:30
शहरातील छत्रपती चौक ते मोर चौकादरम्यान अंबिकानगनरजवळ मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली़ अचानक जलवाहिनी फुटून रस्त्यावर पाणी येत असल्याने नागरिक अवाक् झाले़ तर रस्त्यातून उच्च दाबाने येणारे पाण्याचे लोट पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहरातील छत्रपती चौक ते मोर चौकादरम्यान अंबिकानगनरजवळ मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली़ अचानक जलवाहिनी फुटून रस्त्यावर पाणी येत असल्याने नागरिक अवाक् झाले़ तर रस्त्यातून उच्च दाबाने येणारे पाण्याचे लोट पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती़
काबरानगर येथील जलशुद्धीकरण केंद्रातून नांदेड उत्तरमधील बहुतांश भागात पाणीपुरवठा केला जातो़ जलशुद्धीकरण केंद्रातून छत्रपती चौकाकडे जाणारी जलवाहिनी नरहर कुरूंदकरनगरच्या पाटीजवळ मुख्य रस्त्यावर फुटली़ यातील मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोट येत असल्याने दहा ते पंधरा मिनिटांमध्ये नरहरनगर पाटीपासून ते बजाजनगर पाटीपर्यंत रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते़
डांबरी रस्त्यातून अचानक पाणी येत असल्याने सर्वजण चकित झाले़ पाण्याच्या प्रवाहामुळे रस्ता उखडून निघाला़ दरम्यान, लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याचा संदेश सोशल मीडियावर सर्वत्र फिरत आहे़ त्याचाच आधार घेत काहींनी भूकंपामुळेच पाणी रस्त्यातून पाणी येत असल्याची अफवा परिसरात पसरवली़ त्यामुळे येणाºया-जाणाºयांसह परिसरातील नागरिकांनी पाण्याचे लोट पाहण्यासाठी गर्दी केली़ परंतु, येथे उपस्थित असलेल्या विश्वजित पावडे, स्वप्निल जाधव, रोहन सुंडगे, बाळासाहेब देसाई आदी युवकांनी सदर पाणी पाईपलाईन फुटल्याने येत असल्याचे सर्वांना सांगितले़ तसेच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली़