दुचाकीवरील नियंत्रण सुटले; एक ठार, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:04 AM2021-09-15T04:04:32+5:302021-09-15T04:04:32+5:30
सिल्लोड/शिवना : तालुक्यात तिसऱ्या दिवशीदेखील खराब रस्त्याने पुन्हा एक बळी घेतला आहे. अजिंठा-बुलडाणा मार्गावरील शिवनाजवळ खड्डे चुकविताना दुचाकीस्वाराचा ताबा ...
सिल्लोड/शिवना : तालुक्यात तिसऱ्या दिवशीदेखील खराब रस्त्याने पुन्हा एक बळी घेतला आहे. अजिंठा-बुलडाणा मार्गावरील शिवनाजवळ खड्डे चुकविताना दुचाकीस्वाराचा ताबा सुटल्याने गाडी थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टिप्परला जाऊन धडकली. यात एक व्यक्ती जागीच ठार झाली, तर एक गंभीर जखमी आहे. हा अपघात मंगळवारी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास घडला. ज्ञानेश्वर रामभाऊ बाविस्कर (५०, रा. हिसोडा बुद्रुक, ता. भोकरदन) असे ठार झालेल्याचे नाव असून रामदास फकिरा सुरडकर (रा. हिसोडा बुद्रुक) हे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर व रामदास हे दोघे शिवना येथून दुचाकीने (क्र. एमएच २१ बीए ९८१०) हिसोडा गावाकडे निघाले होते. दरम्यान अंजिठा-बुलडाणा रस्त्याची दुरवस्था झालेली असून खड्डेच खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे खड्डे चुकवीत वाहनधारक जीव धोक्यात घालून वाहन चालवितात. असाच काहीसा प्रकार दुचाकीचालक ज्ञानेश्वर बाविस्कर यांच्यासमवेत घडला असावा. गाडीवरील ताबा सुटल्याने ते थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टिप्परला (क्र. एमएच २० ईजी ७०६३) जाऊन धडकली. यात ज्ञानेश्वर बाविस्कर यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच शिवना ग्रामस्थांनी धाव घेतली. अजिंठा पोलिसांना माहिती देण्यात आली. ठाण्याचे सपोनि. अजित विसपुते, फौजदार राजू राठोड, के. जी. पवार, बाबा चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी व जखमीस पुढील उपचारासाठी अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले गेेले. अजिंठा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
140921\img-20210914-wa0381.jpg
(अपघात ग्रस्त मोटार सायकल दिसत आहे