सावकारी पाश आवळतोय...!

By Admin | Published: May 30, 2017 12:35 AM2017-05-30T00:35:21+5:302017-05-30T00:36:46+5:30

जालना : नापिकी, कर्ज देताना बँकांकडून होणारी अडवणूक आणि खासगी सावकारांचा वाढता तगादा यामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे

Loving loopholes ... | सावकारी पाश आवळतोय...!

सावकारी पाश आवळतोय...!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यात विरोधी पक्षांची संघर्ष यात्रा सुरू आहे, तर दुसरीकडे सरकार शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी विविध योजना राबवित असल्याचे सांगण्यासाठी शिवार संवाद अभियान राबवित आहे. मात्र, राजकीय चिखलफेकित शेतकऱ्यांच्या मूळ समस्या दुर्लक्षित होत आहे. नापिकी, कर्ज देताना बँकांकडून होणारी अडवणूक आणि खासगी सावकारांचा वाढता तगादा यामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. गत तीन वर्षांत तब्बल १९२ शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे.
घनसावंगी तालुक्यातील शेवगळ येथील सुनील अण्णासाहेब रणपिसे या तरुणाने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
तीन वर्षांत जालना जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून समोर येत आहे. नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतमालास न मिळणारा भाव, बँकांचे वेळकाढून धोरण आणि खाजगी सावकाराचा घट्ट होत असलेला विळखा यामुळे तीन वर्षांत तब्बल १९२ शेतकऱ्यांनी विषारी द्रव प्राशन करून किंवा गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. यातील वीस शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळालेली नाही. तर २०१७ मध्ये आत्महत्या केलेल्या १२ शेतकऱ्यांच्या मृत्यूचा रासायनिक परीक्षण अहवाल प्राप्त न झाल्याने ते शासकीय मदतीपासून अद्याप वंचित आहेत.
कर्ज फेडल्यानंतरही जमिनीचा ताबा न सोडणाऱ्या सावकाराच्या जाचास कंटाळून मंठा तालुक्यातील हेलस येथील लक्ष्मीबाई विठ्ठल खराबे (४५) यांनी विष प्राशन केले. उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाला. या प्रकरणी संशयितांवर गुन्हाही दाखल झाला. या घटनेने सावकराचा फास किती शेतकऱ्यांवर आवळला जातोय, हे अधोरेखित होते. जिल्ह्यात आजही अनेक शेतकऱ्यांची फसवणूक हे सावकार करीत आहेत. कर्जासाठी तारण म्हणून ठेवलेली जमीन खरेदी केली जात असून, कर्जाची परतफेड करू न शकलेल्या अनेकांच्या जमिनी बळकवण्याचे प्रकार सुरू आहेत.

Web Title: Loving loopholes ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.