मूर्तिजापूर, तोरणागड व म्हाडा कॉलनीत कमी दाबाने पाणीपुरवठा
By | Published: November 22, 2020 09:02 AM2020-11-22T09:02:38+5:302020-11-22T09:02:38+5:30
महापालिका आमच्याकडून वर्षभराची पाणीपट्टी घेते आणि पाणी मात्र तीन महिने येत नाही. तसेच फक्त अर्धा तास चाळीस मिनिटे पाणी ...
महापालिका आमच्याकडून वर्षभराची पाणीपट्टी घेते आणि पाणी मात्र तीन महिने येत नाही. तसेच फक्त अर्धा तास चाळीस मिनिटे पाणी कमी दाबाने येते, याकडे या भागातील सामाजिक कार्यकर्त्या गौराबाई जाटवे यांच्यासह श्यामल कुलकर्णी, आनंदा गायकवाड, रूपाली टाले, संगीता कुलकर्णी, आशा चोरमारे, लीला जाधव, सिंधू काळे, वंदना सोनटक्के, सुरेखा चौधरी, अनिता वीर, जयश्री दंडे, ज्योती खरात, रंजना वर्मा आदींनी महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधून यात सुधारणा झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
तसेच पुष्पक गार्डन येथे नवी पाईपलाईन टाकण्यात यावी, अशी मागणीही या भागातील नागरिकांनी केली आहे. पुष्पक गार्डन परिसरात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे आठ आठ दिवस पाणी येत नसल्याने टँकर व जारचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. या भागात नवीन पाईपलाईन मंजूर करून पाण्याचा प्रश्न सोडविण्यात यावा, अशी मागणी मनपा प्रशासनाकडे या भागातील १०६ नागरिकांनी सह्यांच्या निवेदनाद्वारे केली आहे.