मध्यम प्रकल्पांमध्ये अत्यल्प जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:12 AM2017-08-31T00:12:10+5:302017-08-31T00:12:10+5:30

जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये उपयुक्त जलसाठ्याची टक्केवारी केवळ १४.४४ टक्के आहे. गत आठवड्यातील दमदार पावसानंतरही प्रकल्पांमधील पाणी पातळीत वाढ झालेली नाही.

 Low water storage in medium projects | मध्यम प्रकल्पांमध्ये अत्यल्प जलसाठा

मध्यम प्रकल्पांमध्ये अत्यल्प जलसाठा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये उपयुक्त जलसाठ्याची टक्केवारी केवळ १४.४४ टक्के आहे. गत आठवड्यातील दमदार पावसानंतरही प्रकल्पांमधील पाणी पातळीत वाढ झालेली नाही.
जालना जिल्ह्यात आतापर्यंत ४२३.७७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील ७ मध्यम व ५७ लघु प्रकल्पांपैकी सुमारे ३५ प्रकल्पांमधील पाणीसाठा जोत्याखाली आहे. कल्याण गिरजा, कल्याण मध्यम, अप्पर दुधना, जुई मध्यम, गल्हाटी मध्यम प्रकल्प, धामना व जीवरेखा या प्रकल्पांमधील पाणीपातळी ५० टक्कयांपेक्षा कमी आहे. या प्रकल्पांमधून अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. येणाºया काळात समाधानकारक पाऊस न झाल्यास बहुतांश गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. मात्र, परतूर, घनसावंगी, अंबड वगळता भोकरदन, जालना, जाफराबाद, मंठा, बदनापूर तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे विहिरींच्या पाणीपातळीत अद्यापही वाढ झालेली नाही. उपलब्ध पाण्याचे ठिबक सिंचनच्या साहाय्याने नियोजन करून पिकांना पाणी देत आहेत.

Web Title:  Low water storage in medium projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.