जेवण अर्धवट सोडून घेतला गळफास

By Admin | Published: September 12, 2016 11:16 PM2016-09-12T23:16:39+5:302016-09-12T23:24:26+5:30

औरंगाबाद : जेवण अर्धवट सोडून खरकट्या हातानेच छताला गळफास घेऊन एका तरुणाने आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना रविवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

The lunch was partially abandoned | जेवण अर्धवट सोडून घेतला गळफास

जेवण अर्धवट सोडून घेतला गळफास

googlenewsNext

औरंगाबाद : जेवण अर्धवट सोडून खरकट्या हातानेच छताला गळफास घेऊन एका तरुणाने आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना रविवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ज्ञानेश्वर पंढरीनाथ खराटे (२५, रा. पॉवरलूम, ब्रीजवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, ज्ञानेश्वर एका खाजगी कंपनीत काम करीत असे.
रविवारी रात्री त्याचा भाऊ नोकरीवर गेलेला होता. तर आई आजारी असल्याने ती बहिणीच्या घरी गेलेली आहे. वॉचमन असलेले वडील रात्रपाळीला गेलेले होते. ज्ञानेश्वरचा घरगुती कारणावरून भाऊ, भावजयीसोबत वाद होत असे. रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास तो घरी एकटाच जेवण करीत होता. जेवण करीत असताना अचानक त्याच्या डोक्यात आत्महत्येचा विचार आला. जेवण अर्धवट सोडून त्याने गळफास घेतला.
तासाभरानंतर ड्यूटी संपवून त्याचा भाऊ घरी आला तेव्हा ज्ञानेश्वरने गळफास घेतल्याचे त्यास दिसले. त्यानंतर त्याने आरडाओरड केल्याने शेजारी धावले. त्यांच्या मदतीने त्यास घाटी रु ग्णालयात दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. याविषयी एमआयडीसी सिडको ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घरगुती कारणावरून ज्ञानेश्वरने आत्महत्या केल्याचे पोहेकॉ. शेख यांनी सांगितले.

Web Title: The lunch was partially abandoned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.