मारेकऱ्यांना कैची पुरविल्याच्या संशयावरून टेलरच्या दुकानाची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 05:32 PM2019-01-15T17:32:08+5:302019-01-15T17:32:18+5:30
घरभाड्यातून मिळणाºया रकमेवर डोळा ठेवत कट रचून घरमालक ाचा कैचीने खून करणाºया मारेकºयांना कैची पुरविल्याच्या संशयावरून मृताच्या नातेवाईकांनी टेलरच्या दुकानाची तोडफोड करीत मारहाण केली.
औरंगाबाद : घरभाड्यातून मिळणाºया रकमेवर डोळा ठेवत कट रचून घरमालक ाचा कैचीने खून करणाºया मारेकºयांना कैची पुरविल्याच्या संशयावरून मृताच्या नातेवाईकांनी टेलरच्या दुकानाची तोडफोड करीत मारहाण केली. ही घटना रविवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास रहेमानिया कॉलनीत घडली.
कैसर कॉलनीतील रहिवासी समद खान अहेमद खान यांचा १२ जानेवारी रोजी रहेमानिया कॉलनीत सायंकाळी चार ते साडेचार वाजेदरम्यान धारदार कैचीने भोसकून खून करण्यात आला होता. मृताचा चुलतभाऊ फिरोज खान मुसा खान यांच्या तक्रारीवरून जिन्सी पोलिसांनी दोन विधि संघर्षग्रस्त बालकांसह (अल्पवयीन मुले) उस्मान पटेल याला अटक केली. उस्मानने कट रचून दोन अल्पवयीन मुलांकडून ही हत्या करून घेतल्याचे तक्रारीत नमूद केले होते. या हत्येसाठी मारेकºयांनी समद खान यांनी तेथील एका टेलरच्या दुकानातून धारदार कैची मिळविली होती.
त्या टेलरिंगच्या दुकानावर रविवारी सायंकाळी लाकडी दांड्याने हल्ला करून काचेची तोडफोड करून टेलर शेख आयुब शेख हसन (रा. रहेमानिया कॉलनी) यांना मारहाण केली. चार जणांनी हे कृत्य केल्याचे सूत्रांनी सांगतले. टेलर आयुब शेख हे काही महिन्यांपूर्वी मृत समद खान यांच्या इमारतीत भाड्याने राहत होते. मात्र, त्यांनी आयुब शेख यांना रूम खाली करायला लावल्याने त्यांच्यात भांडण झाले होते. टेलरने मारेकºयांना स्वत:हून कैची दिल्याचा संशय हल्लेखोरांना आहे. त्यातूनच त्यांनी दुकानाची तोडफोड केल्याचे बोलले जाते.
तक्रार दाखल करण्यास टेलरचा नकार
मारहाणीत जखमी झालेल्या आयुब शेख यांनी घाटी रुग्णालयात उपचार घेतले. घाटी पोलीस चौकीच्या पोलिसांनी याबाबतची एमएलसी नोंद जिन्सी पोलिसांना पाठविली. शिवाय घटनेची माहिती मिळताच जिन्सी ठाण्याचे निरीक्षक श्यामसुंदर वसुरकर, उपनिरीक्षक दत्ता शेळके आणि कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी मात्र टेलर आयुब यांनी पोलिसांत तक्रार नोंदविण्यास नकार दिल्याचे जिन्सी पोलिसांनी सांगितले.