माधुरी ॲग्रो इंडस्ट्रीचा आज शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:04 AM2021-01-17T04:04:56+5:302021-01-17T04:04:56+5:30
चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रात : शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते उद्घाटन औरंगाबाद : चिखलठाणा एमआयडीसी, येथील सीटीआर कंपनीसमोरील सात्विक ...
चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रात : शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते उद्घाटन
औरंगाबाद : चिखलठाणा एमआयडीसी, येथील सीटीआर कंपनीसमोरील सात्विक गोल्ड उत्पादन ब्रँड असलेल्या माधुरी ॲग्रो फूड इंडस्ट्रीचे उद्घाटन रविवारी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर (माधुरी ॲग्रो इंडस्ट्रीचे ब्रँड अँम्बॅसिडर) यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी आ. हरिभाऊ बागडे हे राहतील.
सोहळ्यास खा. भागवत कराड, माजी खा. चंद्रकांत खैरे, आ. अतुल सावे, माजी शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, माजी महापौर नंदकुमार घोडेले, गजानन बारवाल, कृषी उत्पन्न बाजार माजी सभापती राधाकिसन पठाडे, तालुकाध्यक्ष रामबाबा शेळके, जिल्हा उपनिबंधक अनिल दाबशेडे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. माधुरी ॲग्रो फूड इंडस्ट्रीमधील उत्पादनाविषयी माहिती देताना आशिष गट्टाणी म्हणाले, की मराठवाड्यातील एकमेव सुसज्ज असे भव्यदिव्य वातानुकूलित अद्ययावत दालन मराठवाड्यातील ग्राहकांसाठी उपलब्ध होत आहे. आमच्याकडे सात्विक गोल्ड, सिल्व्हर आदी नावाने गहू आटा, बेसन आटा, रवा, सुजी इत्यादी उत्पादने चांगल्या आणि उच्च प्रतीच्या गव्हातून निर्माण होणार असून, यामध्ये १ किलोपासून ते ५० किलोपर्यंत पॅकिंग ग्राहकांसाठी वाजवी दरात उपलब्ध असणार आहेत. आमच्या इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन करणार असल्याने होलसेलच्या दरात देणे आम्हांला सोयीचे ठरणार आहे. एकूण १० ते १२ प्रकारच्या प्रॉडक्ट उत्पादन करीत १०० टक्के शुद्ध आटा देण्याचे मानस आहे. शुद्ध आट्यातून तयार झालेली पोळी १२ तास ताजा आणि नरम राहील याची काळजी घेत उत्पादन करीत असताना घेतोय. औरंगाबाद शहर, जिल्हा तसेच मराठवाड्यातील ग्राहकांनी एकवेळेस अवश्य भेट द्यावी, असे आवाहन समाजसेवक शामसुंदर गट्टाणी, आशिष गट्टाणी, माधुरी गट्टाणी, तनिष गट्टाणी आणि पूर्वी गट्टाणी यांनी केले आहे.