मग्रारोहयोत अपहार; तिघांवर गुन्हा दाखल
By Admin | Published: May 4, 2017 11:15 PM2017-05-04T23:15:38+5:302017-05-04T23:19:24+5:30
बीड : तालुक्यातील शिवणी येथे मग्रारोहयोतून झालेल्या विविध कामांसाठी बोगस मजुरांच्या नावावर सव्वाचार लाख रुपये उचलून अपहरण केल्याचे समोर आले होते.
बीड : तालुक्यातील शिवणी येथे मग्रारोहयोतून झालेल्या विविध कामांसाठी बोगस मजुरांच्या नावावर सव्वाचार लाख रुपये उचलून अपहरण केल्याचे समोर आले होते. याप्रकरणी बुधवारी रात्री पिंपळनेर ठाण्यात तिघांवर गुन्हा नोंद झाला.
शिवणी येथे मग्रारोहयोतून सिंचन विहीर, शेततळी मंजूर झाली होती. या कामासाठी नोंदविलेल्या मजुरांच्या यादीत नोकरदार, दिव्यांग व मयत व्यक्तींची नावे समाविष्ट केली होती. यासंदर्भात जिल्हा परिषदेकडे तक्रार आली होती. चौकशीअंती बोगस मजुरांची नावे लावून सुमारे चार लाख ३२ हजार ३१५ रुपये उचलल्याचे समोर आले होते. सीईओ नामदेव ननावरे यांनी गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. त्यानुसार पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी रवींद्र तुरूकमारे यांनी पिंपळनेर ठाण्यात फिर्याद दिली.
शिवणी येथील ग्रामरोजगार सेवक रामदास पिराजी सानप, पोस्टमास्तर शाहू गुंड, तांत्रिक अधिकारी मोहन रावसाहेब शेळके यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला. या कारवाईने मग्रारोहयोत बोगसगिरी करणाऱ्यांच्या झोपा उडाल्या आहेत. (प्रतिनिधी)