महावितरणकडून रोहित्र दुरुस्तीची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:20 AM2017-07-31T00:20:57+5:302017-07-31T00:20:57+5:30
हिंगोली : शहरातील धोकादायक रोहित्रांच्या दुरूस्तीची कामे महावितरणकडून केली जात आहेत. अनेक ठिकाणी रोहित्रांवरील उघडे प्यूज बॉक्स तसेच नवीन विद्युत तारा बसविण्याची मोहीम जोरात सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील धोकादायक रोहित्रांच्या दुरूस्तीची कामे महावितरणकडून केली जात आहेत. अनेक ठिकाणी रोहित्रांवरील उघडे प्यूज बॉक्स तसेच नवीन विद्युत तारा बसविण्याची मोहीम जोरात सुरू आहे.
शहरातील वीजपुरवठ्यासाठी हिंगोली शहरात महावितरणची एकूण २७६ रोहित्रे आहेत. यातील निम्म्या रोहित्रांना दरवाजेच नाहीत. महावितरणकडून नुकतेच दरवाजे नसलेल्या रोहित्रांचे सर्वेक्षण केले. त्यात जवळपास २२ रोहित्र अधिक धोकादायक असल्याचे समोर आले होते. त्यामुळे दुरूस्तीची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. शिवाय काही ठिकाणी विद्युत तारा, व इतर कामेही केली जात असल्याचे चित्र रविवारी दिसून आले. लोकमतने रोहित्रांच्या दुरवस्थेबाबत दोन दिवस मालिका प्रकाशित केली. तसेच शहरातील विविध प्रभागातील नागरिकांनी रोहित्रांच्या दुरूस्तीबाबत निवेदनेही अभियंत्याकडे सादर केली होती. सदरील कामाबाबत महावितरणचे अभियंता दिनकर पिसे यांना विचारले असता ते म्हणाले प्रथम धोकादायक पूर्ण रोहित्रांची दुरूस्ती केली जात आहे. तसेच अनेक ठिकाणी असलेल्या विजेच्या समस्याही लवकरच सोडविण्यात येतील. यासाठी महावितरणला थोडा कालावधी लागेल, परंतु दुरूस्तीची कामे लकरच पूर्ण केली जातील, असे त्यांनी सांगितले. रोहित्रांच्या दुरूस्तीची कामे केली जात असल्याने काहीवेळ विजपुरवठा खंडीत राहू शकतो. त्यामुळे वीज ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहनही पिसे यांनी केले. रोहित्रातील बिघाडामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने वीजग्राहकांना नाहक त्रास होत आहे. दुरूस्ती झाल्यास गैरसोय टळण्यास मदत होणार आहे.