शहराची नवी ओळख निर्माण करणारी ‘महामॅरेथॉन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 12:18 AM2017-09-24T00:18:56+5:302017-09-24T00:18:56+5:30

‘लोकमत महामॅरेथॉन स्पर्धेमुळे औरंगाबादची नवी ओळख निर्माण होत असून, या ऐतिहासिक शहराचा एक आगळावेगळा पैलू समोर येत आहे’, असे कौतुकास्पद उद्गार आहेत प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल लिसा रे हिचे.

The 'Mahamarethon' that creates a new identity for the city | शहराची नवी ओळख निर्माण करणारी ‘महामॅरेथॉन’

शहराची नवी ओळख निर्माण करणारी ‘महामॅरेथॉन’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘लोकमत महामॅरेथॉन स्पर्धेमुळे औरंगाबादची नवी ओळख निर्माण होत असून, या ऐतिहासिक शहराचा एक आगळावेगळा पैलू समोर येत आहे’, असे कौतुकास्पद उद्गार आहेत प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल लिसा रे हिचे. संपूर्ण शहराला वेध लागलेल्या लोकमत महामॅरेथॉन स्पर्धेच्या अधिकृत टी शर्टचे तिच्या हस्ते लाँचिंग करण्यात आले. लोकमत महामॅरेथॉनच्या संस्थापिका आणि संचालिका रुचिरा दर्डा यावेळी उपस्थित होत्या.
गेल्या वर्षीपासून ‘लोकमत’तर्फे शहरात मॅरेथॉनचे आयोजन केले जात आहे. त्यामागचा हेतू स्पष्ट करताना रुचिरा दर्डा म्हणाल्या की, ‘लोकांमध्ये आरोग्याविषयी जागृती निर्माण होऊन त्यांच्या मनात शहराविषयी अभिमान निर्माण व्हावा, या उद्देशाने मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते. आजच्या युवकांना मुंबई-पुण्याचे आकर्षण वाटते.
औरंगाबाददेखील अशा महानगरांपेक्षा कमी नाही, हे दाखवून देण्यासाठी, तरुणांना औरंगाबादकडे आकर्षित करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.’
गेल्या वर्षी सर्व वयोगटातील सात हजार लोकांनी या स्पर्धेत भाग घेतल्याचे कळल्यावर लिसा रे आनंदून गेली. यंदा या उपक्रमाचे दुसरे वर्षे असून १७ डिसेंबर रोजी लोकमत महामॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. दरम्यान, ८ आॅक्टोबर रोजी नाशिकमध्ये ही स्पर्धा होत आहे.
‘आपल्या मातृभूमीविषयी, आपल्या शहराविषयी पुढच्या पिढीमध्ये गर्व निर्माण करण्यासाठी अशा स्वरूपाचे स्तुत्य उपक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्याची गरज आहे.
कारण कोणताही बदल घडवून आणण्यासाठी तो बदल स्वत:पासून करावा लागतो. महानगरांचे स्वप्न उराशी बाळगून आपल्या शहराचा विकास होत नसतो. जागतिक स्तरावरील शहर होण्याची औरंगाबादमध्ये पूर्ण क्षमता आहे आणि ती क्षमता या मॅरेथॉनमुळे लोकांना कळेल’, असा संदेश लिसाने यावेळी दिला.

Web Title: The 'Mahamarethon' that creates a new identity for the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.