जय मल्हारच्या जयघोषात खुलताबादेत खंडोबांच्या काठीची महापूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:07 AM2021-02-05T04:07:21+5:302021-02-05T04:07:21+5:30
मंगलपेठ, बाजारपेठ येथील अतिशय प्राचीन परंपरा असलेली श्री खंडोबाची काठी गुरुवारी रात्री ९ वाजता अजित सोनवणे यांच्या घरून गावाचे ...
मंगलपेठ, बाजारपेठ येथील अतिशय प्राचीन परंपरा असलेली श्री खंडोबाची काठी गुरुवारी रात्री ९ वाजता अजित सोनवणे यांच्या घरून गावाचे आराध्य दैवत मंगलादेवी मंदिर येथे आणली गेली. यावेळी दिवटी बुधल्यांवर पेटविलेल्या पलित्याच्या सोनेरी प्रकाशात भंडारा उधळत सर्व मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविकांना गुळ आणि खोबऱ्याचा प्रसाद वाटप करण्यात आला. मिरवणूक मंगलादेवी मंदिरात आल्यानंतर तळी उचलण्यात आली. त्यानंतर काठीची पूजा व महाआरती करण्यात आली. या पारंपरिक उत्सवात दिगंबर चव्हाण, बंडू गुरू, नानासाहेब सावजी, विवेक कायस्थ, दिनेश सावजी, महालकर, विलास सावजी, किशोर भावसार,चंद्रशेखर सावजी, अविनाश सावजी, शिवप्रसाद कायस्थ, गणेश सावजी, दिनेश कायस्थ, प्रकाश कायस्थ, प्रफुल्ल कुलकर्णी, प्रफुल्ल सावजी, महेंद्र जोशी,नंदकिशोर चव्हाण, बंडू चौधरी, विनोद चौधरी, राजू पवार आदींसह भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
फोटो कॅप्शन : खुलताबाद येथे श्री खंडोबा काठीच्या महापूजेप्रसंगी सहभागी झालेले भाविक.