"...तर राजीनामा देऊन त्यांचा कार्यकर्ता होईन"; आमदार प्रशांत बंब यांचं चॅलेंज सतीश चव्हाण स्वीकारणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 10:41 AM2024-11-10T10:41:43+5:302024-11-10T10:43:52+5:30
Prashant Bamb Vs Satish Chavan : "तर मी राजीनामा देऊन त्याचा कार्यकर्ता बनून जाईल. आणखी आता काय बोलू? संपूर्ण राज्याच्या समोर बोलतोय."
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये राजकीय वातावरण जबरदस्त तापताना दिसत आहे. नेते मंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना आणि आव्हान प्रतिआव्हान देताना दिसत आहेत. यातच गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे मराठवाड्याचे पदवीधर आमदार तथा आपले प्रतिस्पर्धक सतिश चव्हाण यांना एका मंचावर येऊन, तुम्ही तुमची कामे सांगा, मी माझी कामे सांगतो. जर माझ्या 10 टक्के कामे जरी त्यांनी केली असतील, तर मी राजीनामा देऊन त्यांचा कार्यकर्ता बणून जाईन, असे खुले आव्हाण दिले आहे. बंब गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजी येथे बोलत होते.
तर मी राजीनामा देऊन त्याचा कार्यकर्ता बनून जाईल -
बंब म्हणाले, "माझ्या समोर जे उभे आहेत त्यांना माझे जाहीर आव्हान आहे, त्यांनी 17 वर्षात काय केले त्याचा लेखा जोखा द्यावा. माझी त्यांना आणि मीडियाला विनंती आहे की, तुम्ही सगळे मीडिया वाले माझी आणि त्यांची समोरासमोर बसवून आमच्या दोघांचे कामे विचारात. समोरासमोर बसवा, तयार आहे मी. येणारच नाही येथे, चॅलेंज आहे. सगळ्या मीडिया वाल्यांनी त्यांना विनंती करायची आहे की, तुम्ही पदवीधर आमदार आहात आणि हा 15 वर्षापासून आमदार आहे. मग एक काम करा, समोरासमोर बसा. तुम्ही तुमची कामे सांगा, मी माझी कामे सांगतो. जर माझ्या 10 टक्के कामे जरी त्यांनी केली असतील, तर मी राजीनामा देऊन त्याचा कार्यकर्ता बनून जाईल. आणखी आता काय बोलू? संपूर्ण राज्याच्या समोर बोलतोय."
माझ्या मतदारसंघात हे जे उभे आहेत ना, हे राज्यावरचं संकट -
"मित्रांनो, माता भगिनी, हे माझ्या मतदारसंघात जे उभे आहेत ना, हे राज्यावरचं संकट आहे. नुसते माझ्या मतदार संघात शडयंत्र नाहीये. अशी प्रवृत्ती जर आपल्या राज्यामध्ये बळावली तर उद्या आपल्या राज्याचा रास होईल. म्हणून माझं त्यांना चॅलेंज आणि आव्हान आहे की, त्यांनी समोरासमोर बसावे," असेही बंब म्हणाले.
यामुळे आता, आमदार प्रशांत बंब यांचे हे जाहीर आव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे मराठवाड्याचे पदविधर आमदार सतिश चव्हाण स्वीकारणार का? हे दोघेही आमदार आपापली कामे घेऊन, जनतेसमोर एका मंचावर येणार का? हे बघण्यासारखे असेल.