औरंगाबादच्या आमीदच्या हॅट्ट्रिकने महाराष्ट्राने साकारला पहिला विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 01:14 AM2019-02-22T01:14:26+5:302019-02-22T01:14:37+5:30

साईच्या पश्चिम विभागीय केंद्रातील अ‍ॅस्ट्रो टर्फवर सुरूअसलेल्या ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत पहिल्या सलग तीन पराभवानंतर औरंगाबादचा प्रतिभावान खेळाडू आमीद खान याने नोंदवलेल्या गोलच्या हॅट्ट्रिकच्या बळावर यजमान महाराष्ट्राने पहिला विजय साकार केला. महाराष्ट्राने कर्नाटक संघावर ४-२ अशा गोलने दणदणीत विजय मिळवला.

Maharashtra beat the hat-trick of Aamid in the first match of the tournament | औरंगाबादच्या आमीदच्या हॅट्ट्रिकने महाराष्ट्राने साकारला पहिला विजय

औरंगाबादच्या आमीदच्या हॅट्ट्रिकने महाराष्ट्राने साकारला पहिला विजय

googlenewsNext

औरंगाबाद : साईच्या पश्चिम विभागीय केंद्रातील अ‍ॅस्ट्रो टर्फवर सुरूअसलेल्या ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत पहिल्या सलग तीन पराभवानंतर औरंगाबादचा प्रतिभावान खेळाडू आमीद खान याने नोंदवलेल्या गोलच्या हॅट्ट्रिकच्या बळावर यजमान महाराष्ट्राने पहिला विजय साकार केला. महाराष्ट्राने कर्नाटक संघावर ४-२ अशा गोलने दणदणीत विजय मिळवला.
या सामन्यात औरंगाबादच्या आमीद यानेच जबरदस्त कामगिरी करताना ११ व्या मिनिटाला गोल करीत महाराष्ट्राचे गोलचे खाते उघडले. त्यानंतर आमीद खान याने आपला जादुई खेळ पुढे कायम ठेवताना ५0 व ४९ व्या मिनिटाला गोल करीत महाराष्ट्राची स्थिती मजबूत केली. प्रज्वल मोहोरकरने ५६ व्या मिनिटाला महाराष्ट्राचा चौथा गोल नोंदवताना संघाचा विजय निश्चित केला. कर्नाटककडून एन. एम. सूर्या याने ४१ व व्ही. सुरेश याने ५९ व्या मिनिटाला गोल करीत यजमानांना कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशविरुद्धही महाराष्ट्रातर्फे एकमेव गोल आमीद खान यानेच केला होता. आज झालेल्या अन्य सामन्यांत हिमाचल प्रदेशने एसएससीबीचा ४ वि. ३ असा पराभव केला. त्यांच्याकडून वाशू देव याने ५३, ५६ आणि ५८ व्या मिनिटाला गोल करीत हॅट्ट्रिक साधली. झारखंडने मुंबई संघावर ४-0, ओडिशाने साई संघावर १-0 अशी मात केली. ड गटातील लढतीत नबीन कुंजूर याने ९ व्या, २७ व्या व ३५ व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या बळावर स्टील प्लांट बोर्ड संघाने पंजाब अँड सिंध बँकेवर ३ विरुद्ध २ गोलफरकाने मात केली.

शुक्रवारी रंगणारे सामने
स. ७ वा. : पंजाब वि. हिमाचल, स. ८.३0 वा. : चंदीगड वि. तामिळनाडू, स. १0 वा. : हरियाणा वि. मुंबई, दु. १ वा. : ओडिशा वि. कर्नाटक, दु. २.३0 वा. : उत्तर प्रदेश वि. दिल्ली, दु. ४ वा. पंजाब अँड सिंध बँक वि. हॉकी.

Web Title: Maharashtra beat the hat-trick of Aamid in the first match of the tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.