महाराष्ट्र-बंगाल लढत अनिर्णीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:43 AM2017-11-16T00:43:45+5:302017-11-16T00:43:53+5:30
डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदानावर आज संपलेली महाराष्ट्र व बंगाल या दोन संघांतील १९ वर्षांखालील कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेतील लढत अनिर्णीत राहिली. या लढतीत पहिल्या डावात आघाडी घेणाºया बंगालने ३, तर यजमान महाराष्ट्राने १ गुणाची कमाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदानावर आज संपलेली महाराष्ट्र व बंगाल या दोन संघांतील १९ वर्षांखालील कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेतील लढत अनिर्णीत राहिली. या लढतीत पहिल्या डावात आघाडी घेणाºया बंगालने ३, तर यजमान महाराष्ट्राने १ गुणाची कमाई केली. अभिजितच्या ८१, सुदीप कुमारच्या ५५ आणि सयानकुमार बिस्वास याच्या ५३ धावांच्या बळावर बंगालने पहिल्या डावात ३४४ धावा केल्या. महाराष्ट्राकडून सिद्धेश वरगंटे याने १०७ धावांत ३ गडी बाद केले. ए. पोरे, ए. जाधव व पारस गवळी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. त्यानंतर प्रत्युत्तरात महाराष्ट्राने पहिल्या डावात २८३ धावा केल्या. महाराष्ट्राकडून अथर्व काळे याने १५६ चेंडूंत ५ चौकार, २ षटकारांसह सर्वाधिक ७७ धावा केल्या. एस. वीर याने २१४ चेंडूंत ४ चौकारांसह ६०, तर सिद्धेश वरंगटे याने ३३ धावांचे योगदान दिले. बंगालकडून प्रयास राय बर्मन याने ९१ धावांत ४ गडी बाद केले. करण व अक्षय पांडे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. पहिल्या डावात ६१ धावांची आघाडी घेणाºया बंगालने दुसºया डावात ८ बाद ३०६ धावा केल्या. त्यांच्याकडून करण याने १४३ चेंडूंत ८ चौकार व ५ षटकारांसह १०० धावा केल्या. सायनकुमार बिस्वास याने २१७ चेंडूंत १२ चौकारांसह ७५ धावांची खेळी केली. महाराष्ट्राकडून सिद्धेश वरगंटे याने ८४ धावांत ४ व ए. जाधव याने ४३ धावांत २ गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
बंगाल (पहिला डाव) : ३४४. दुसरा डाव : ८ बाद ३0६.महाराष्ट्र (पहिला डाव) : सर्वबाद २८३.