Maharashtra Budget: मराठवाड्यातील दुष्काळ निवारणासाठी २० हजार कोटींची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 03:04 PM2023-03-09T15:04:50+5:302023-03-09T15:05:58+5:30

वॉटरग्रीड योजनेचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे

Maharashtra Budget 2023: Provision of 20 thousand crores for drought relief in Marathwada | Maharashtra Budget: मराठवाड्यातील दुष्काळ निवारणासाठी २० हजार कोटींची तरतूद

Maharashtra Budget: मराठवाड्यातील दुष्काळ निवारणासाठी २० हजार कोटींची तरतूद

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यातील पाण्याची समस्या कायमची दूर करून दुष्काळ निवारण करण्यासाठी राज्य सरकारने तब्बल २० हजार कोटींची तरतूद केल्याची घोषणा अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. तसेच  मराठवाडा वॉटरग्रीड योजनेचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आल्याचे देखील फडणवीस यांनी सांगितले.

मराठवाडा दुष्काळी प्रदेश म्हणून गणला जातो. प्रदेशातील मोजक्याच धरणांमुळे काही अंशी सिंचन वाढले आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील मोठ्या भागात शेती आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे अत्यावश्यक होते. यासाठी राज्य सरकार सरसावले आहे. नदीजोड प्रकल्पातून दुष्काळी भागात पाणी आणण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने २० हजार कोटींची तरतूद केल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात जाहीर केले. 

मराठवाडा वॉटरग्रीडचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेला
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, पैठण तालुक्यांना जायकवाडी धरणातून पाणी
- बीड, लातूर जिल्ह्यांसाठी जायकवाडी, माजलगाव, उर्ध्वमनार धरणातून पाणी
- धाराशिव जिल्ह्यासाठी उजनी, सीना कोळेगाव, निम्नतेरणा धरणातून धरणातून पाणी

असे असतील नदीजोड प्रकल्प... 
- दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प राज्य निधीतून
- नार-पार, अंबिका, औरंगा, दमणगंगा, वैतरणा, उल्हास नद्यांच्या उपखोर्‍यातील पाणी वापरणार
- मुंबई, गोदावरी खोर्‍यातील तूट भरून काढण्यासाठी पाणी वापरणार
- मराठवाडा तथा उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगावला लाभ
- वैनगंगा खोर्‍यातील वाहून जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्पातून नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यांना लाभ

Web Title: Maharashtra Budget 2023: Provision of 20 thousand crores for drought relief in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.