Maharashtra Election 2019 : औरंगाबाद जिल्ह्यातील ९ मतदारसंघात २०७ उमेदवारी अर्ज वैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 06:41 PM2019-10-05T18:41:16+5:302019-10-05T18:44:09+5:30

एकूण ३४४ अर्जांपैकी ४० उमेदवारी अर्ज बाद 

Maharashtra Election 2019: 2 candidates from 2 constituencies in Aurangabad district are valid | Maharashtra Election 2019 : औरंगाबाद जिल्ह्यातील ९ मतदारसंघात २०७ उमेदवारी अर्ज वैध

Maharashtra Election 2019 : औरंगाबाद जिल्ह्यातील ९ मतदारसंघात २०७ उमेदवारी अर्ज वैध

googlenewsNext

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जाची छाननी शनिवार करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील ९ मतदारसंघात २०७ अर्ज वैध तर ४० उमेदवारांची अर्ज बाद झाली. 

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात नऊ मतदारसंघासाठी शेवटच्या दिवशी एकूण २४६ उमेदवारांची ३४४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम पक्ष या प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेल्या नऊ मतदारसंघात २०७ पैकी छानणीअंती ४० उमेदवारांचे अर्ज बाद झाली. शपथ पत्रातील त्रुटी, सूचकांची स्वाक्षरी नसणे यामुळे हे उमेदवारी अर्ज विधानसभा निवडणूक प्रक्रियेत अपात्र ठरली असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांनी दिली आहे. दरम्यान, ७ ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे अर्ज मागे घेतल्यानंतरच निवडणूकीच्या रिंगणात खरे उमेदवार कोण ते स्पष्ट होईल.

नामनिर्देशन अर्ज छाननीत बाद झालेले उमेदवार संख्या :
औरंगाबाद पूर्व ६, औरंगाबाद पश्चिम - १२, औरंगाबाद मध्य- ४, फुलंब्री -२, सिल्लोड -१, कन्नड -१, वैजापूर -१, गंगापूर-९, पैठण -४

Web Title: Maharashtra Election 2019: 2 candidates from 2 constituencies in Aurangabad district are valid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.