Maharashtra Election 2019 : सेनेच्या शिरसाट विरुद्ध भाजपच्या शिंदे यांचे आव्हान कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 04:23 PM2019-10-07T16:23:30+5:302019-10-07T16:25:41+5:30

शिवेसना विरुद्ध भाजप बंडखोर मैदानात 

Maharashtra Election 2019 : BJP's Shinde challenged against Sena's sanjay shirsat | Maharashtra Election 2019 : सेनेच्या शिरसाट विरुद्ध भाजपच्या शिंदे यांचे आव्हान कायम

Maharashtra Election 2019 : सेनेच्या शिरसाट विरुद्ध भाजपच्या शिंदे यांचे आव्हान कायम

googlenewsNext
ठळक मुद्दे'औरंगाबाद पश्चिम'मध्ये भाजप बंडखोरी कायम

औरंगाबाद : पश्चिम विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय शिरसाठ उमेदवार अर्ज असले तरी भाजपचे नगरसेवक राजू शिंदे निवडणूक रिंगणात कायम आहेत. दरम्यान, कॉंग्रेस उमेदवार रमेश गायकवाड यांनी अर्ज अवैध झाल्यानंतर खंडपीठात धाव घेतली होती. आज दुपारी सुनावणी घेण्यात आली असता गायकवाड यांनी याचिका माघार घेतल्याची माहिती आहे.

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात भाजपकडून इच्छुक असलेले राजू शिंदे यांनी निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच तयारी सुरु केली होती. दरम्यान, शिवसेनेकडून आमदार संजय शिरसाठ यांनाच औरंगाबाद पश्चिममधून पुन्हा उमेदवारी देण्यात आली. मात्र या मतदारसंघात प्रचाराची आघाडी घेतलेल्या भाजपच्या राजू शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत त्यांना आव्हान दिले.  

आ. शिरसाठ यांच्या उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच शिंदे यांनी मतदारसंघात मोठे कार्यालय थाटून शासनाच्या योजना जनतेपर्यंत नेण्यास सुरुवात केली होती. तसेच औरंगाबाद पश्चिमची निवडणूक ही यंदा मतदारसंघातील न सुटलेल्या प्रश्नांवर होणार आहे. हीच बाब हेरून शिंदे यांनी या मतदारसंघात काम करायला सुरुवात केली आणि आ. शिरसाट यांच्यापुढे तेच प्रबळ उमेदवार असल्याचे वातावरण तयार करण्यात ते यशस्वी झाले. यामुळेच शिरसाठ यांची उमेदवारी जाहीर झालेलीं असतानाही बंडखोरी करत शिंदे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याची चर्चा आहे.

२०१४ मध्ये भाजपा उमेदवार दुसऱ्या स्थानी 
२०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपची युती झाली नाही. त्यावेळी भाजपचे मधुकर सावंत यांनी आ. शिरसाट यांना जोरदार लढत दिली. सावंत यांची तयारी नसताना त्यांना पक्षाने तिकीट दिले आणि त्यांनी ५४ हजार ३५५ इतकी मते घेतली. आ. शिरसाट यांना त्यावेळी ६१ हजार २८२ मते मिळाली. या निवडणुकीच्या काही दिवसांनंतरच राजू शिंदे यांनी या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले. 

Web Title: Maharashtra Election 2019 : BJP's Shinde challenged against Sena's sanjay shirsat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.