Maharashtra Election 2019 : चिंता नाही...खडसे कोणाच्या आग्रहाला बळी पडणार नाहीत;दानवे यांना विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 03:14 PM2019-10-03T15:14:59+5:302019-10-03T15:21:48+5:30

अनेक नेते गेली ३५ वर्ष एकनाथ खडसे यांना भेटत आली आहेत.

Maharashtra Election 2019 : No worries ... Khadase will not succumb to anyone's insistence; Danave believes | Maharashtra Election 2019 : चिंता नाही...खडसे कोणाच्या आग्रहाला बळी पडणार नाहीत;दानवे यांना विश्वास

Maharashtra Election 2019 : चिंता नाही...खडसे कोणाच्या आग्रहाला बळी पडणार नाहीत;दानवे यांना विश्वास

googlenewsNext

औरंगाबाद : राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कॉंग्रेसची अनेक नेते गेली ३५ वर्ष एकनाथ खडसे यांना भेटत आली आहेत. मात्र खडसे त्यांच्या आग्रहाला कधीच बळी पडले नाहीत असा विश्वास केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. 

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ यांनी भाजपकडून फुलंब्री मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे त्यांच्यासोबत उपस्थित होते. यावेळी भाजपमध्ये तिकीट वाटपावरून नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांची राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी घेतलेल्या भेटीबद्दल विचारले असता दानवे म्हणाले की, मागील ३५ वर्षात राष्ट्रवादीचे अजित पवार आणि कॉंग्रेसची मंडळी अनेक वेळा विविध कारणांनी त्यांना भेटत असतात. त्यांना वेगवेगळा आग्रह करत असतात मात्र ते कोणाच्या आग्रहाला बळी पडले नाहीत. खडसे भाजपचे जेष्ट नेते आहेत, आज जरी पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नसली तरी पक्ष त्यांना उमेदवारी देऊ शकतो. किंवा भविष्यात त्यांच्याबद्दल मोठा विचार केला जाऊ शकतो असा विश्वाससुद्धा दानवे यांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: Maharashtra Election 2019 : No worries ... Khadase will not succumb to anyone's insistence; Danave believes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.