Maharashtra Election 2019 :सत्तारांना शह देण्यासाठी पालोदकर अपक्ष लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 04:20 PM2019-10-04T16:20:11+5:302019-10-04T16:25:39+5:30

स्थानिक भाजपचीही साथ

Maharashtra Election 2019 : Prabhakar Palodkar will fight as independence against Abdul Sattar in Siloud | Maharashtra Election 2019 :सत्तारांना शह देण्यासाठी पालोदकर अपक्ष लढणार

Maharashtra Election 2019 :सत्तारांना शह देण्यासाठी पालोदकर अपक्ष लढणार

googlenewsNext
ठळक मुद्देकाँग्रेसने बदलली उमेदवारीसत्तारांना शह देण्यासाठी उतरणार मैदानात

औरंगाबाद : काँग्रेसने सिल्लोड मतदारसंघात जाहीर केलेली प्रभाकर पालोदकरांची उमेदवारी अचानक बदलल्याने राजकारणाने वेगळा रंग घेतला. त्यांच्याऐवजी कैसर आजाद यांना उमेदवारी देण्यात आली असली तरी प्रभाकर पालोदकर हे अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

काँग्रेस पक्षातर्फे बुधवारी उशीरा रात्री पालोदकरांची उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र गुरुवारी सकाळपासून सिल्लोड मतदारसंघात वेगाने हालचाली होऊन पालोदकर यांनी अपक्ष म्हणून लढावे, यासाठी भाजप आणि शिवसेनेतील निष्ठांतांनी आग्रह धरल्याने पालोदकर अपक्ष म्हणून मैदानात उतरणार आहेत. पालोदकरांची उमेदवारी बदलणे आणि कैसर आजादसारख्याला उमेदवारी मिळणे यातून अनेक संकेत स्पष्ट झाले आहेत. 

भाजपच्या वाटेवर असलेल्या आ. अब्दुल सत्तार यांच्या प्रवेशाला भाजपमधून तीव्र विरोध झाला. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत त्याचे पडसाद उमटल्याने लगेचच सत्तार यांना शिवसेनेचा दरवाजा उघडा करून देत उमेदवारीही जाहीर केली. या घटना घडल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमधील असंतोष अधिक तीव्र झाला आणि शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने पालोदकरांनी अपक्ष उभे राहावे असे प्रयत्न सुरू झाले होते. यासाठी काँग्रेस-भाजप या पक्षांमधील समविचारी नेत्यांच्या बैठका झाल्या. या बैठकीनंतरही काँग्रेसतर्फेच लढण्यासाठी पालोदकर आग्रही होते. एका क्षणी पालोदकर उभे राहिले तरी भाजपमधील असंतुष्टांनी स्वबळावर अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची तयारी चालू केली होती.

गुरुवारी दिवसभर यावर बरीच खलबते झाल्यानंतर सर्वांचा एकच उमेदवार म्हणून पालोदकरांच्या नावाला सर्वांनी संमती दिली आणि काँग्रेसची उमेदवारी न घेता त्यांनी अपक्ष म्हणून लढण्याची तयारी दर्शविली. या खेळीने सत्तार विरोधकांच्या मताचे विभाजन टाळण्यात काँग्रेस आणि भाजपमधील मंडळी एका अर्थाने यशस्वी झाली आहे.जिंकणारा उमेदवार म्हणून भाजपने सत्तार यांना प्रवेश देण्याचे ठरविले होते; पण पक्षांतर्गत विरोध पाहून त्यांना सेनेकडे पाठविण्यात आले हे स्पष्ट झाले. आता सरळ लढतीत त्यांचाही कस लागणार असून, सिल्लोडची निवडणूक रंगतदार होईल, असे दिसते.

काँग्रेसच्या उमेदवारामुळे समीकरण बदलले
अब्दुल सत्तार यांना चकमा देण्यासाठी काँग्रेसने सिल्लोड मतदारसंघात ऐनवेळी कैसर आजाद हा मुस्लिम चेहरा दिल्याने या मतदारसंघात आता मुस्लिम मतांमध्ये विभाजन होण्याची शक्यता आहे. यामुळे शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांना काहीसा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पालोदकर हे शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. 

Web Title: Maharashtra Election 2019 : Prabhakar Palodkar will fight as independence against Abdul Sattar in Siloud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.