Maharashtra Election 2019 : ढगाळ वातावरण, चिखलमय रस्त्यांचा मतदानात अडथळा; औरंगाबाद जिल्ह्यात ४ तासात केवळ १३ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 12:10 PM2019-10-21T12:10:07+5:302019-10-21T12:28:58+5:30
औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्या दोन तासात केवळ ६.७१ टक्के मतदान झाले होते
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. सोमवारी मतदानाच्या दिवशी सकाळपासून काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. तर शहरात ढगाळ वातावरण आहे. याचा थेट परिणाम मतदानावर झाल्याचे दिसून येत आहे. पावसात मतदार घराच्या बाहेर न पडल्याने जिल्ह्यात मतदानाची ११.३० वाजेपर्यंतची सरासरी ही केवळ १३.१२ टक्के आहे.
पावसामुळे अनेक मतदार केंद्राभोवती पाणी साचले आहे. तसेच आज सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. यामुळे मतदार घराच्या बाहेर पडले नाहीत. मतदार केंद्राकडे जाणाऱ्या मार्गावर चिखल व पाणी असल्याने मतदारांना केंद्रावर पोहचण्यास अडथला येत आहे.
जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी :
सिल्लोड : १४.५
कन्नड : १३.२३
फुलंब्री : १३.७२
औरंगाबाद मध्य : १४.२२
औरंगाबाद पश्चिम : १२.५१
औरंगाबाद पूर्व : १३.१
पैठण : १४.३
गंगापूर : ११.१
वैजापूर : ११.२
एकूण : १३. १२
औरंगाबाद: हर्सूल येथील एकनाथ विद्या मंदिर येथील मतदान केंद्रात समोर अर्धा किलो मीटर चिखलच चिखल पसरलेला आहे त्यामुळे मतदारांना ये-जा करण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.