महाराष्ट्र शासनाचा सयाजीराव गायकवाडांवर २५ खंडांचा प्रकल्प; पहिल्या १२ खंडांचे बडोद्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 03:56 PM2018-01-16T15:56:34+5:302018-01-16T15:57:41+5:30

महाराष्ट्र शासनाचा सयाजीराव गायकवाडांवर २५ खंडांचा प्रकल्प; पहिल्या १२ खंडांचे बडोद्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

Maharashtra government's 25 block projects on Sayajirao Gaikwad; The publication of the first 12 volumes in Baroda in the hands of the Chief Minister | महाराष्ट्र शासनाचा सयाजीराव गायकवाडांवर २५ खंडांचा प्रकल्प; पहिल्या १२ खंडांचे बडोद्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

महाराष्ट्र शासनाचा सयाजीराव गायकवाडांवर २५ खंडांचा प्रकल्प; पहिल्या १२ खंडांचे बडोद्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

googlenewsNext

औरंगाबाद : स्वातंत्र्यपूर्व काळात विविध क्षेत्रांमध्ये प्रबोधनाची कास धरून लोकशाही संविधानाचा पाया घालणार्‍या महाराज सयाजीराव गायकवाड यांचे समग्र गौरवशाली कार्य लवकरच वाचकांसमोर येणार आहे. राज्य शासनाने गठित केलेल्या ‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती’तर्फे एकूण २५ खंडांमध्ये त्यांच्या अक्षरधनाचा वारसा प्रकाशित केला जाणार असून, त्यापैकी पहिल्या १२ खंडांचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १६ फेब्रुवारी रोजी बडोदा येथे होणार्‍या ९१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात करण्यात येणार आहे. यावेळी संमेलनाच्या स्वागताध्यक्षा शुभांगिनी राजे गायकवाड आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित राहतील, अशी माहिती ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
पहिल्या बारा खंडांमध्ये दोन भाषण संग्रह, तीन पत्रसंग्रह, दोन इंग्रजी भाषण संग्रह, चार इंग्रजी पत्रव्यवहार आणि एक गौरव ग्रंथ यांचा समावेश आहे. सयाजीराव यांच्याशी निगडित साहित्य सामुग्री भारतासह अमेरिका आणि इंग्लंड येथून गोळा करण्यात आली. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली गठित या समितीचे राज्यमंत्री रवींद्र वायकर उपाध्यक्ष आहेत. समितीमध्ये उच्चशिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे, संचालक डॉ. धनराज माने, शासकीय मुद्रणालयाचे संचालक गोसावी यांच्यासह बाबा भांड, मंदा हिंगुराव, डॉ. रमेश वरखेडे, डॉ. एकनाथ पगार, आणि डॉ. अशोक राणा यांचा समावेश आहे. 
५० खंडांचा मानस
समग्र सयाजीराव गायकवाड यांच्या विशाल कार्याला ग्रंथरुपी जगासमोर आणण्यासाठी ५० खंड प्रकाशित करण्याचा मानस आहे. तूर्तास २५ खंडांचे काम पूर्ण झाले असून, पुढील खंडांसाठी शासनाकडे मागणी करण्यात येईल.
- बाबा भांड, सदस्य सचिव,
 महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती

Web Title: Maharashtra government's 25 block projects on Sayajirao Gaikwad; The publication of the first 12 volumes in Baroda in the hands of the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.