महाराष्ट्र पब्लिक स्कूल, सेंट जोन्स संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 11:57 PM2017-12-11T23:57:31+5:302017-12-11T23:57:50+5:30

जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ स्टेडियमवर सुरू असलेल्या व्हेरॉक करंडक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र पब्लिक स्कूलने डी.व्ही.एम. संघावर ५२ धावांनी विजय मिळवला. दुसºया लढतीत सेंट जोन्सने टेंडर केअर होम संघावर मात केली.

Maharashtra Public School, St John's team won | महाराष्ट्र पब्लिक स्कूल, सेंट जोन्स संघ विजयी

महाराष्ट्र पब्लिक स्कूल, सेंट जोन्स संघ विजयी

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ स्टेडियमवर सुरू असलेल्या व्हेरॉक करंडक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र पब्लिक स्कूलने डी.व्ही.एम. संघावर ५२ धावांनी विजय मिळवला. दुसºया लढतीत सेंट जोन्सने टेंडर केअर होम संघावर मात केली.
महाराष्ट्र पब्लिक स्कूलने प्रथम फलंदाजी करताना १५ षटकांत ४ बाद १0८ धावा केल्या. त्यांच्याकडून अभिजित तोष्णीवालने २४ चेंडूंत ३ चौकारांसह ३२, प्रथमेश देवने १६ चेंडूंत ३ चौकारांसह नाबाद २४ व धीरजने नाबाद १४ धावा केल्या. डीव्हीएमकडून सूरज चव्हाणने २ गडी बाद केले. महेश निंबाळकर व ज्ञानेश्वर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात डीव्हीएम संघ १२.५ षटकांत ५६ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून महेश निंबाळकरने १८ चेंडूंत ३ चौकारांसह २२ धावा केल्या. महाराष्ट्र पब्लिक स्कूलकडून तनुज सोळुंकेने ९ धावांत ३, तर आदित्य पाटील व कृष्णा ठोंबरे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात टेंडर केअर होमने १५ षटकांत ८ बाद ९१ धावा केल्या. त्यांच्याकडून सार्थक अक्कर याने २ चौकारांसह २४ व शंतनू बºहाळे याने २१ चेंडूंत १ चौकार, एका षटकारासह २४ धावा केल्या. सेंट जोन्सकडून संयम नरवडेने ९ धावांत २ गडी बाद केले. अजय पांचाल, गौरव जैस्वाल, अभिषेक कांबळे व आकाश चव्हाण यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात सेंट जोन्सने ७ गडी गमावून विजयी लक्ष्य गाठले. त्यांच्याकडून संयम नरवडेने ३ चौकारांसह नाबाद २८ व देवांग अष्टुरकरने १५ धावा केल्या. टेंडर केअरने ३७ धावा या अवांतर स्वरूपात देताना पराभव ओढून घेतला. टेंडर केअरकडून सार्थक अक्कर याने ७ धावांत ४ व अनिष रे याने २ गडी बाद केले. शिवम काळेने १ गडी बाद केला.

Web Title: Maharashtra Public School, St John's team won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.