राज्य मंत्रिमंडळ ‘फाइव्ह स्टार’मध्ये! मोठी हॉटेल्स बुक, ३०० वाहने सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 09:54 AM2023-09-16T09:54:54+5:302023-09-16T09:55:33+5:30

Maharashtra State Cabinet: मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव सांगता समारंभाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक शहरात होत आहे. या बैठकीची जोरदार तयारी करण्यात आली असून, निवास, भोजन, स्वागतासाठी सगळी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.

Maharashtra State Cabinet in 'Five Star'! Big hotels book, 300 vehicles ready | राज्य मंत्रिमंडळ ‘फाइव्ह स्टार’मध्ये! मोठी हॉटेल्स बुक, ३०० वाहने सज्ज

राज्य मंत्रिमंडळ ‘फाइव्ह स्टार’मध्ये! मोठी हॉटेल्स बुक, ३०० वाहने सज्ज

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव सांगता समारंभाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक शहरात होत आहे. या बैठकीची जोरदार तयारी करण्यात आली असून, निवास, भोजन, स्वागतासाठी सगळी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.

मराठवाड्यात आतापर्यंत झालेल्या मंत्रिमंडळाची परंपरा  शिंदे सरकार मोडीत काढणार आहे. आजवर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांचा मुक्काम सुभेदारी विश्रामगृहातच राहिलेला आहे. मात्र, यावेळी सुभेदारीऐवजी पंचतारांकित हॉटेलमधील सूटमध्ये मुख्यमंत्री व मंत्री राहणार आहेत. विलासराव देशमुख यांनी २००८ साली, तर देवेंद्र फडणवीस यांनी २०१६ साली विश्रामगृहातच मुक्काम केला होता. 

कुठे केले आहे बुकिंग?
३० रूम बुक - रामा हॉटेल - मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मंत्री 
७० रूम बुक - अमरप्रीत हॉटेल -   उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी
४०  रूम बुक - ताज हॉटेल - सर्व सचिव
४०  रूम बुक - अजंता अम्बेसेडर - उपसचिव, अधिकारी 

३०० वाहनांचा ताफा 
मंत्रिमंडळ बैठकीसाठी ३०० चारचाकी असतील. १० लाख रुपये वाहनावर खर्च होतील, तर मंत्री, सचिव व इतर अधिकारी वर्गासाठी एक दिवसाच्या दोन वेळच्या जेवणावर २० लाख रुपये खर्च होतील.

Web Title: Maharashtra State Cabinet in 'Five Star'! Big hotels book, 300 vehicles ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.