शालेय राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 12:19 AM2018-01-08T00:19:17+5:302018-01-08T00:20:01+5:30
तेलंगणातील नालगोंडा येथे ८ ते १३ जानेवारीदरम्यान होणाºया शालेय राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा १४ व १७ वर्षांखालील संघ रवाना झाला आहे. महाराष्ट्राच्या संघात औरंगाबादचा आंतरराष्ट्रीय खेळाडू दुर्गेश जहागीरदार, शाकेर सय्यद, अभय शिंदे, वेदांत खैरनार यांचाही समावेश आहे.
औरंगाबाद : तेलंगणातील नालगोंडा येथे ८ ते १३ जानेवारीदरम्यान होणाºया शालेय राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा १४ व १७ वर्षांखालील संघ रवाना झाला आहे. महाराष्ट्राच्या संघात औरंगाबादचा आंतरराष्ट्रीय खेळाडू दुर्गेश जहागीरदार, शाकेर सय्यद, अभय शिंदे, वेदांत खैरनार यांचाही समावेश आहे.
रवाना झालेला महाराष्ट्राचा संघ (१४ वर्षांखालील मुले) : मार्तंड झोरे, अरण मेश्राम, अथर्व माने, प्रणव महानवर, चेतन वाकेकर, आदित्य भुरे, यश वाघ, वेदांत खैरनार. निखिल वाघ, हर्षल सकपाळ, मुकुल भेडारकर, ऋषिकेश शिंदे. मुली : भक्ती कोरडे, प्राची कानडे, वामा मणियार, लुम्बिनी मेश्राम, श्राव्या आहेर, वैदेही लोहिया, खुशी थटेरे, सारा रावत, कशिष भराड, वैभवी इंगळे, प्रकाश माहेक, हर्षदा वंजारे.
१७ वर्षांखालील मुले : महेश कोरडे, तनिष्क सूर्यवंशी, सुमित पाटील, इशांत पवार, शाकेर सय्यद दुर्गेश जहागीरदार, जय खंडेलवाल, आशिष गवळी, अभय शिंदे, साहिल चव्हाण, निरंजय पाटील, जयंत पाटील. मुली : ज्ञानेश्वरी शिंदे, सिमरन कौर संधू, सहर्षा उदावंत, प्राजक्ता मोरे, हर्षदा दमकोंडवार, आरुषी अजय सिंग, आदिती दास, प्रीती टेकाळे, श्रुती जोशी, उन्नती आयलवार, आदिती सोनवणे, सानिका मोरे.
महाराष्ट्राच्या संघासोबत व्यवस्थापक म्हणून क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, तर मार्गदर्शक म्हणून अजिंक्य दुधारे, सागर मगरे, राजू शिंदे, विलास वाघ जात आहेत.
महाराष्ट्राच्या संघाचे शिबीर औरंगाबादेत झाले होते. या शिबिराचा समारोप भारतीय तलवारबाजी महासंघाचे कोषाध्यक्ष अशोक दुधारे, राज्य संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, आंतरराष्ट्रीय खेळाडू अजिंक्य दुधारे, कोमलप्रीत शुक्ला, राजू शिंदे, स्वप्नील तांगडे, अजय त्रिभुवन, सदानंद सवळे यांच्या उपस्थितीत झाला. या संघास क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.