श्वेता जाधवच्या शतकी तडाख्याने महाराष्ट्र विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 01:11 AM2017-12-15T01:11:21+5:302017-12-15T01:13:47+5:30

औरंगाबादची आंतरराष्ट्रीय सीनिअर क्रिकेटपटू श्वेता जाधव हिच्या तडाखेबंद शतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने बडोदा येथे आज झालेल्या बीसीसीआयच्या सीनिअर महिलांच्या वनडे साखळी क्रिकेट स्पर्धेत मुंबईवर २१ धावांनी सनसनाटी विजय मिळवला.

Maharashtra won by Shweta Jadhav's century | श्वेता जाधवच्या शतकी तडाख्याने महाराष्ट्र विजयी

श्वेता जाधवच्या शतकी तडाख्याने महाराष्ट्र विजयी

googlenewsNext
ठळक मुद्देसीनिअर महिला क्रिकेट स्पर्धा : बलाढ्य मुंबईवर २१ धावांनी मात

औरंगाबाद : औरंगाबादची आंतरराष्ट्रीय सीनिअर क्रिकेटपटू श्वेता जाधव हिच्या तडाखेबंद शतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने बडोदा येथे आज झालेल्या बीसीसीआयच्या सीनिअर महिलांच्या वनडे साखळी क्रिकेट स्पर्धेत मुंबईवर २१ धावांनी सनसनाटी विजय मिळवला.
श्वेता जाधव हिने चौफेर टोलेबाजी करीत ९६ चेंडूंत १२ सणसणीत चौकार व एका टोलेजंग षटकारासह केलेल्या १०१ धावांच्या बळावर प्रथम फलंदाजी करणाºया महाराष्ट्राने ४९.५ षटकांत २१९ धावा फटकावल्या. आघाडीचे फलंदाज स्वस्तात तंबूत परतत असताना डावखुरी शैलीदार फलंदाज श्वेता जाधव हिने शिवाली शिंदे हिच्या सथीने दुसºया गड्यासाठी ७३ आणि औरंगाबादची अष्टपैलू खेळाडू प्रियंका गारखेडे हिच्या साथीने आठव्या गड्यासाठी ६८ धावांची झुंजार भागीदारी करीत महाराष्ट्राला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. प्रियंका गारखेडे हिने ६९ चेंडूंत ३ चौकारांसह ३७ आणि शिवाली शिंदे हिने ३ चौकारांसह ३० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. मुंबईकडून फातिमा जाफर व वृषाली भगत यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. पी. नाईक हिने २ बळी घेतले.
प्रत्युत्तरात मुंबईचा संघ ४८.५ षटकांत १९८ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून श्वेता हरनहाली हिने ७ चौकारांसह ५५, एच. काझी हिने ३० धावा केल्या. महाराष्ट्राकडून उत्कर्षा पवार हिने ३२ धावांत ३ गडी बाद केले. कविता पाटील, माया सोनवणे व तेजल हसबनीस यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. शतकवीर श्वेता जाधव हिला कर्मवीर लव्हेरा यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल एमसीएच्या सीनिअर निवड समितीचे चेअरमन यांनी महाराष्ट्र संघाचे तसेच शतकवीर श्वेता जाधव हिचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Maharashtra won by Shweta Jadhav's century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.