राष्ट्रीय गदा युद्ध स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 12:56 AM2019-03-04T00:56:50+5:302019-03-04T00:57:16+5:30

नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय गदायुद्ध स्पर्धेत महाराष्ट्राने १६ सुवर्ण, १० रौप्य आणि ४ कास्यांसह एकूण ३० पदकांची लूट करताना महाराष्ट्राने विजेतेपद पटकावले. चंदीगडने दुसरे व झारखंड संघने तिसरे स्थान पटकावले.

Maharashtra won the title of National Mace War | राष्ट्रीय गदा युद्ध स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद

राष्ट्रीय गदा युद्ध स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद

googlenewsNext

औरंगाबाद : नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय गदायुद्ध स्पर्धेत महाराष्ट्राने १६ सुवर्ण, १० रौप्य आणि ४ कास्यांसह एकूण ३० पदकांची लूट करताना महाराष्ट्राने विजेतेपद पटकावले. चंदीगडने दुसरे व झारखंड संघने तिसरे स्थान पटकावले.
महाराष्ट्राचे पदकविजेते खेळाडू : सुवर्ण : समीक्षा राठोड, आकाश दारकड, अभय इखारे, कुणाल काटकर, आशिष म्हस्के, आदर्श बोर्डे, यश चव्हाण, ओम सोनवणे, रेणुका यादव, सायली शिंदे, यश राजपूत, ओंकार गरड, ऋषिकेश केकाण, अन्वर पठाण, रामेश्वर पुंड, शार्दुल उबाळे. रौप्य : गौरव तेलभाते, क्षितिज दाभाडे, सौरभ झारे, पार्थ सोनवणे, संस्कृती झारे, तेजस पाठोडे, पार्थ दिवठाणकर, प्रदीप देवकाते, श्री भंडारे. कास्यपदक : रोहित राठोड, श्रावणी मगर, श्रेयस कुरले, कुणाल शिंदे. विजेतेपद पटकावणाऱ्या महाराष्ट्र संघाला राज्य संघटनेचे सचिव मच्छिंद्र राठोड, प्रशिक्षक संदीप राठोड, चारुलता सूर्यवंशी, चंद्रशेखर सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल गदा स्पोटर््स असोसिएशन आॅफ महाराष्ट्रचे अध्यक्ष मिलिंद पाटील, केदार रहाणे, पंकज भारसाखळे, विकास ठोकळ, सुधाकर गायकवाड, उदय डोंगरे, दिनेश वंजारे, संदीप जगताप, प्रदीप खांड्रे, महेश उबाळे, प्रभारी क्रीडा उपसंचालक अशोक गिरी, क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, माणिक राठोड, गणेश कड, विष्णू दिवठाणकर, ज्ञानेश्वर सोनवणे, राजाराम राठोड आदींनी अभिनंदन केले आहे.

 

Web Title: Maharashtra won the title of National Mace War

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.