राष्ट्रीय योगा स्पर्धेत महाराष्ट्राने ठोकला विजेतेपदाचा चौकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 12:58 AM2019-02-02T00:58:20+5:302019-02-02T00:59:13+5:30
विभागीय क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या राष्ट्रीय शालेय योगा स्पर्धेत यजमान महाराष्ट्राने वर्चस्व राखताना विजेतेपदाचा चौकार ठोकला. महाराष्ट्राने १४ आणि १७ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या गटात सांघिक सुवर्णपदक पटकावले. वैयक्तिक मुली आर्टिस्टिक गटात महाराष्ट्राच्या मृणाल खोत हिने सुवर्णपदक जिंकले.
औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या राष्ट्रीय शालेय योगा स्पर्धेत यजमान महाराष्ट्राने वर्चस्व राखताना विजेतेपदाचा चौकार ठोकला. महाराष्ट्राने १४ आणि १७ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या गटात सांघिक सुवर्णपदक पटकावले. वैयक्तिक मुली आर्टिस्टिक गटात महाराष्ट्राच्या मृणाल खोत हिने सुवर्णपदक जिंकले.
सांघिक निकाल (१४ वर्षांखालील मुले) : सुवर्ण : महाराष्ट्र, रौप्य : दिल्ली, कास्य : छत्तीसगड. मुली : सुवर्ण : महाराष्ट्र, रौप्य : त्रिपुरा, कास्य : पश्चिम बंगाल.
१७ वर्षांखालील मुले : सुवर्ण : महाराष्ट्र, रौप्य : दिल्ली, कास्य : छत्तीसगड. मुली : सुवर्ण : महाराष्ट्र, रौप्य : दिल्ली, कास्य : पश्चिम बंगाल.
१४ वर्षांखालील वैयक्तिक (मुले) : सुवर्ण : वदुण्य चढ्ढा (दिल्ली), रौप्य : रूपेश सांगे (महाराष्ट्र), कास्य : यश पाणिभाते (महाराष्ट्र). मुली : सुवर्ण : रीमा बेगम (त्रिपुरा), रौप्य : आर्या तांबे (महाराष्ट्र), कास्य : रितू मंडल (पश्चिम बंगाल). १४ वर्षांखालील आर्टिस्टिक : सुवर्ण : बालाजी (तामिळनाडू), रौप्य : ओमकार सकट (महाराष्ट्र), कास्य : रदीप टिमका (ओरिसा.). मुली : सुवर्ण : मृणाल खोत (महाराष्ट्र), रौप्य : के. चौधरी (पश्चिम बंगाल), कास्य : किंजल खंडेलवाल (कास्य). उद्या सकाळी १० वाजता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बक्षीस वितरण होईल. याप्रसंगी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अंबादास दानवे, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.