बडोद्याविरुद्ध महाराष्ट्राचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:40 AM2017-12-16T00:40:21+5:302017-12-16T00:40:35+5:30

पुणे येथे आज झालेल्या १६ वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफीत उस्मानाबादच्या राजवर्धन हंगरगेकर याच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर महाराष्ट्राने बडोदा संघावर वर्चस्व राखले.

 Maharashtra's domination against Baroda | बडोद्याविरुद्ध महाराष्ट्राचे वर्चस्व

बडोद्याविरुद्ध महाराष्ट्राचे वर्चस्व

googlenewsNext
ठळक मुद्देविजय मर्चंट ट्रॉफी : राजवर्धन हंगरगेकरचे ५ बळी

औरंगाबाद : पुणे येथे आज झालेल्या १६ वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफीत उस्मानाबादच्या राजवर्धन हंगरगेकर याच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर महाराष्ट्राने बडोदा संघावर वर्चस्व राखले. पहिल्या डावात आघाडी घेत महाराष्ट्राने या सामन्यात ४ गुणांची कमाई केली तर बडोदा संघाला अवघ्या एका गुणावर समाधान मानावे लागले.
महाराष्ट्राने अनिकेत नलावडेच्या १६० चेंडूंतील १९ चौकार व एका षटकारासह फटकावलेल्या १२८ धावांच्या बळावर पहिल्या डावात ४७८ धावा ठोकल्या. श्रेयस वालेकरने ८८, हर्षल काटेने ८३ व विकी ओस्वाल यानेही ४९ धावांचे योगदान दिले. बडोदा संघाकडून एच. प्रजापती याने ८७ धावांत ५ गडी बाद केले. अंश पटेल व ए. कुर्मी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
त्यानंतर राजवर्धन हंगरगेकर याच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर महाराष्ट्राने बडोदा संघाला पहिल्या डावात ३५५ धावांत गारद केले. बडोदा संघाकडून कर्णधार ए. पाटीदार याने १५४ चेंडूंत १७ चौकारांसह ९९, हर्ष देसाईने ८०, लक्ष्यजितसिंगने ५०, अदित्य मेमन याने ५२ धावांचे योगदान दिले. महाराष्ट्राकडून राजवर्धन हंगरगेकर याने ६२ धावांत ५ गडी बाद केले. त्याला विकी ओस्वाल याने ६६ धावांत ४ गडी बाद करून सुरेख साथ दिली.

Web Title:  Maharashtra's domination against Baroda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.