महाराष्ट्राचे गुजरातविरुद्ध वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:38 AM2017-12-28T00:38:04+5:302017-12-28T00:38:18+5:30

सुरत येथे बुधवारी संपलेल्या १६ वर्षांखालील विजय मर्चंट करंडक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राने गुजरातविरुद्ध वर्चस्व राखताना ३ गुणांची कमाई केली.

Maharashtra's domination against Gujarat | महाराष्ट्राचे गुजरातविरुद्ध वर्चस्व

महाराष्ट्राचे गुजरातविरुद्ध वर्चस्व

googlenewsNext

औरंगाबाद : सुरत येथे बुधवारी संपलेल्या १६ वर्षांखालील विजय मर्चंट करंडक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राने गुजरातविरुद्ध वर्चस्व राखताना ३ गुणांची कमाई केली. गुजरातला एका गुणावर समाधान मानावे लागले. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद २७६ धावा फटकावल्या. त्यांच्याकडून जे. पटेल याने ६ चौकारांसह ६३, कर्णधार पी. पटेल याने ६५ चेंडूंत ६ चौकारांसह ४५ धावा केल्या. महाराष्ट्राकडून अविराज गावडे याने ५६ धावांत ३, विकी ओस्वाल यानेही ५१ धावांत ३ गडी बाद केले. अविराज गावडे व कौशल तांबे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
प्रत्युत्तरात अथर्व धर्माधिकारी आणि हर्षल काटे यांनी दुसºया गड्यासाठी २५१ धावांची भागीदारी करताना महाराष्ट्राला ४ बाद ३३० धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली. हर्षल काटे याने ३६१ चेंडूंत १९ चौकारांसह १६२ आणि अथर्व धर्माधिकारी याने २७५ चेंडूंत १७ चौकारांसह १३२ धावांची सुरेख खेळी केली. कर्णधार अभिषेक पवारने १७ धावा केल्या. कौशल तांबे १४ धावांवर नाबाद राहिला. गुजरातकडून एस. प्रजापतीने १२७ धावांत ३ गडी बाद केले.

महाराष्ट्राचा संघ ठरला आॅल इंडियासाठी क्वॉलिफाय
गुजरातविरुद्ध वर्चस्व राखणारा महाराष्ट्राचा १६ वर्षांखालील क्रिकेट संघ पश्चिम विभागातून विजय मर्चंट आॅल इंडिया क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरला असल्याची माहिती महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या १६ वर्षांखालील निवड समिती सदस्य राजू काणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. महाराष्ट्राने या स्पर्धेत ४ सामन्यात १० गुणांसह पश्चिम विभागातून अव्वल स्थान मिळवले. बडोदाचा संघ ९ गुणांसह दुसºया स्थानी राहिला आहे. महाराष्ट्राने गुजरात, सौराष्ट्र, बडोदा या संघाविरुद्ध पहिल्या डावात आघाडी घेत प्रत्येकी ३ गुण घेतले, तर मुंबईविरुद्ध पावसामुळे सामना होऊ शकला नाही. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण देण्यात आला होता, असे राजू काणे यांनी सांगितले.

संक्षिप्त धावफलक
गुजरात (पहिला डाव) : १३५.२ षटकांत सर्वबाद २७६. (जे. पटेल ६३, पी. पटेल ४५. विकी ओस्वाल ३/५१, अविराज गावडे ३/५६, कौशल तांबे २/२६, अनिकेत नलावडे २/५७).
महाराष्ट्र (पहिला डाव) : १२४ षटकांत ४ बाद ३३०. (हर्षल काटे १६२, अथर्व धर्माधिकारी १३२, अभिषेक पवार १७. एस. प्रजापती ३/१२७, सी.ए. पटेल १/४६).

Web Title: Maharashtra's domination against Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.