महाराष्ट्राचा सीनिअर संघ जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:20 AM2017-11-24T00:20:00+5:302017-11-24T00:21:41+5:30
बडोदा येथे ८ डिसेंबरपासून सुरू होणाºया सीनिअर महिलांच्या इलाईट ब गटाच्या वनडे साखळी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर झाला आहे. जाहीर झालेल्या संघात औरंगाबादची आंतरराष्ट्रीय फलंदाज श्वेता जाधव, प्रियंका गारखेडे, श्वेता माने, जालना येथील माधुरी आघाव आणि बीडच्या मुक्ता मगरे यांचा समावेश असल्याची माहिती महाराष्ट्र वूमेन्स कमिटीचे चेअरमन प्रदीप देशमुख यांनी लोकमतशी बोलताना दिली.
औरंगाबाद : बडोदा येथे ८ डिसेंबरपासून सुरू होणाºया सीनिअर महिलांच्या इलाईट ब गटाच्या वनडे साखळी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर झाला आहे. जाहीर झालेल्या संघात औरंगाबादची आंतरराष्ट्रीय फलंदाज श्वेता जाधव, प्रियंका गारखेडे, श्वेता माने, जालना येथील माधुरी आघाव आणि बीडच्या मुक्ता मगरे यांचा समावेश असल्याची माहिती महाराष्ट्र वूमेन्स कमिटीचे चेअरमन प्रदीप देशमुख यांनी लोकमतशी बोलताना दिली.
हा संघ दिल्ली आणि उत्तर प्रदेश या दोन लढतीसाठी जाहीर करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद महिलांच्या विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारी डावखुरी शैलीदार फलंदाज स्मृती मानधना भूषवणार आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद येथे या महिन्यात झालेल्या १९ वर्षांखालील पश्चिम विभागीय महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारी अष्टपैलू माया सोनवणे, निकिता आगे, निकिता भोर, आदिती गायकवाड यांचाही या संघात समावेश असल्याचे प्रदीप देशमुख यांनी सांगितले.
महाराष्ट्राचा महिलांचा सीनिअर संघ पुढीलप्रमाणे : स्मृती मानधना (कर्णधार), मुक्ता मगरे, श्वेता जाधव, श्वेता माने, माधुरी आघाव, शिवाली शिंदे (यष्टिरक्षक), तेजल हसबनीस, प्रियंका गारखेडे, उत्कर्षा पवार, निकिता भोर, साई पुरंदरे, आदिती गायकवाड, माया सोनवणे, प्रियंका घोडके, निकिता आगे.
या संघाला महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सचिव रियाज बागवान, महाराष्ट्र वूमेन्स कमिटीचे चेअरमन प्रदीप देशमुख, औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव सचिन मुळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.