महाराष्ट्राचा बंगालवर विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 12:39 AM2018-02-06T00:39:27+5:302018-02-06T00:39:41+5:30

कर्णधार राहुल त्रिपाठीने झळकावलेल्या खणखणीत शतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने अमतर येथील अटल बिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेत गतवर्षी उपविजेतेपद पटकावणाºया बंगाल संघावर ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. बंगालने विजयासाठी दिलेले २९४ धावांचे लक्ष्य महाराष्ट्राने राहुल त्रिपाठीच्या झंझावाती शतकी खेळीच्या बळावर ४५.५ षटकांत फक्त ३ गडी गमावून लीलया पेलले.

Maharashtra's victory over Bengal | महाराष्ट्राचा बंगालवर विजय

महाराष्ट्राचा बंगालवर विजय

googlenewsNext
ठळक मुद्देविजय हजारे करंडक : राहुल त्रिपाठीचे खणखणीत शतक

औरंगाबाद : कर्णधार राहुल त्रिपाठीने झळकावलेल्या खणखणीत शतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने अमतर येथील अटल बिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेत गतवर्षी उपविजेतेपद पटकावणाºया बंगाल संघावर ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला.
बंगालने विजयासाठी दिलेले २९४ धावांचे लक्ष्य महाराष्ट्राने राहुल त्रिपाठीच्या झंझावाती शतकी खेळीच्या बळावर ४५.५ षटकांत फक्त ३ गडी गमावून लीलया पेलले. महाराष्ट्राकडून राहुल त्रिपाठीने सर्वाधिक १0२ चेंडूंतच १२ चौकार व ४ षटकारांसह नाबाद १२५ धावा केल्या. सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने ७0 चेंडूंत ९ चौकार व एका षटकारासह ७७, नौशाद शेखने ३२ चेंडूंत ४ चौकार व एका षटकारासह नाबाद ३९, विजय झोलने ४७ चेंडूंत २ चौकारांसह २४ आणि अंकित बावणे याने २५ चेंडूंत एका षटकारासह २२ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. बंगालकडून अशोक दिंडाने ४७ व सायन घोष याने ३६ धावांत प्रत्येकी १ गडी बाद केला.
विजयाचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाड आणि विजय झोल यांनी सलामीसाठी १३.३ षटकांत ६५ धावांची सलामी दिली. विजय झोल बाद झाल्यानंतर राहुल त्रिपाठी याने खेळाची सूत्रे आपल्याकडे घेताना ऋतुराज गायकवाडच्या साथीने दुसºया गड्यासाठी ८0, अंकित बावणे याच्या साथीने तिसºया गड्यासाठी ४२ आणि नौशाद शेख याच्या साथीने चौथ्या गड्यासाठी नाबाद १0७ धावांची भागीदारी करताना महाराष्ट्राचा विजय सुकर केला. त्याआधी अभिमन्यू ईश्वरनचे शतक आणि कर्णधार मनोज तिवारीच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर बंगालने ५0 षटकांत ९ बाद २९३ धावा फटकावल्या. अभिमन्यू ईश्वरन याने ११४ चेंडूंत १२ चौकारांसह १0३ आणि कर्णधार मनोज तिवारीने ७६ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह नाबाद ८0 धावा फटकावल्या. महाराष्ट्रकडून श्रीकांत मुंडे, अनुपम संकलेचा आणि सत्यजित बच्छाव यांनी प्रत्येकी २, तर शमशुझमा काझी, प्रदीप दाढे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
बंगाल : ५0 षटकांत ९ बाद २९६. (अभिमन्यू ईश्वरन १0३, मनोज तिवारी नाबाद ८0. अनुपम संकलेचा २/३९, सत्यजित बच्छाव २/४८, श्रीकांत मुंढे २/८४, प्रदीप दाढे १/३७, शमशुझमा काझी १/५५).
महाराष्ट्र : ४५.५ षटकांत ३ बाद २९४. (राहुल त्रिपाठी नाबाद १२५, ऋतुराज गायकवाड ७७, नौशाद शेख नाबाद ३९, विजय झोल २४, अंकित बावणे २२. अशोक दिंडा १/४७, सायन घोष १/३६).

 

Web Title: Maharashtra's victory over Bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.