महारेराने औरंगाबादमधील ३९ गृहप्रकल्पांच्या विक्रीवर आणली बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 02:19 PM2021-07-31T14:19:13+5:302021-07-31T14:20:37+5:30

यामध्ये मोठ्या बांधकाम व्यावसायायिकांचा समावेश नाही. यातील ८५ टक्के गृहप्रकल्प छोट्या आकाराचे आहेत.

Maharera bans sale of 39 housing projects in Aurangabad | महारेराने औरंगाबादमधील ३९ गृहप्रकल्पांच्या विक्रीवर आणली बंदी

महारेराने औरंगाबादमधील ३९ गृहप्रकल्पांच्या विक्रीवर आणली बंदी

googlenewsNext
ठळक मुद्देफ्लॅट, दुकाने खरेदी-विक्रीला मनाईग्राहकांना वेळेवर ताबा न दिल्याने निर्णय

औरंगाबाद : मागील चार वर्षांपासून रेंगाळलेले आणि खरेदीदारांना ताबा न दिलेल्या शहरातील ३९ गृहप्रकल्पांची यादी महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (महारेरा) ने जाहीर केली असून, या प्रकल्पातील फ्लॅट आणि दुकाने शॉपच्या खरेदी-विक्रीवर बंदी आणली आहे.

महारेराने राज्यात विक्रीवर बंदी आणलेल्या यादीत ६४४ गृहप्रकल्पांचा समावेश आहे. औरंगाबादमधील ३९ गृहप्रकल्पांचा समावेश आहे. मात्र, यामध्ये मोठ्या बांधकाम व्यावसायायिकांचा समावेश नाही. यातील ८५ टक्के गृहप्रकल्प छोट्या आकाराचे आहेत. यादीत दाखविल्यानुसार ३१ डिसेंबर २०१७ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत गृहप्रकल्प पूर्ण करुन बांधकाम व्यावसायिकांना खरेदीदाराच्या ताब्यात द्यायचे होते, या सर्व प्रकल्पांची नोंदणी महारेरामध्ये करण्यात आली होती. मात्र, काही अडचणींमुळे बांधकाम व्यावसायिकांकडून काही ग्राहकांना त्यांच्या फ्लॅटचा वेळेवर ताबा देता आला नाही. अखेर महारेराने नोंदणीची वैधता कालबाह्य झाली, हे जाहीर केले. आता यापुढे शहरातील या ३९ गृहप्रकल्पांतील कोणताच फ्लॅट, रो-हाऊस, दुकाने विक्री होऊ शकणार नाहीत. या प्रकल्पाबाबत आता कोणतीही ऑफर जाहीर करू शकणार नाहीत, असेही आदेशात म्हटले आहे.

या गृहप्रकल्पांवर निर्बंध
वास्तुशिल्प, साई संकुल फेज वन, साई बन, राजस्वप्नपूर्ती, साई डेव्हलपर्स, वास्तू प्रतिभा रेसिडेन्सी, लक्ष्मीनगर फेज-१, ब्ल्यू ओयॅसिस, इस्मेराल्ड बिल्डिंग-डी, वरद रेसिडेन्सी, साईनाथ व्हॅली फेज-२, पद्मादेवी एन्क्लेव्ह, साई वाटिका अर्पाटमेंट, तेजल पार्क, सिल्व्हर पार्क, मिलेनियम पार्ट ए वन ते ए फोर, द्वारावती रेसिडेन्सी, प्रिन्स टॉवर, कृष्णकुंज, अजय रेसिडेन्सी, लक्ष्मीनगर फेज -२, क्लासिक समर्थ व्हिला, सारा ग्रीन, चंद्रभागा अर्पाटमेंट, ओमकार रेसिडेन्सी, मंगलमूर्ती, श्रीकृष्णनगर, विजयालक्ष्मी फेज, योगिराज सृष्टी, मोरया पार्क फेज-२, कमल एन्क्लेव्ह, गोल्डन रेसिडेन्सी, साईकृपा अपार्टमेंट, भुवी मधुरबन, पिअरशेल, ॲम्पल अमूल्यम, समृद्धी बिल्डर्स, वास्तुशिल्प, ३२ फ्रिडम पार्क साऊथ रिपब्लिक, सिया एन्क्लेव्ह यांचा समावेश आहे.

Web Title: Maharera bans sale of 39 housing projects in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.