लहुगडावर दगडात कोरलेले ‘रामेश्वर’ मंदिर; औरंगाबादजवळ लक्षवेधी निसर्गरम्य प्राचीन वारसा

By प्रशांत तेलवाडकर | Published: February 18, 2023 12:52 PM2023-02-18T12:52:15+5:302023-02-18T12:53:20+5:30

डोंगररांगा, हिरवीगार शेती, अधूनमधून नजरेस पडणारे तलाव, नागमोडी घाट, अशा निसर्गरम्य वातावरणातून लहुगडाकडे जाताना मन हरखून जाते.

Mahashivratri: Rock carved 'Rameshwar' temple at Lahugad; A scenic ancient heritage site surrounded by hills near Aurangabad | लहुगडावर दगडात कोरलेले ‘रामेश्वर’ मंदिर; औरंगाबादजवळ लक्षवेधी निसर्गरम्य प्राचीन वारसा

लहुगडावर दगडात कोरलेले ‘रामेश्वर’ मंदिर; औरंगाबादजवळ लक्षवेधी निसर्गरम्य प्राचीन वारसा

googlenewsNext

- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद :
महाशिवरात्रीनिमित्त तुम्ही ज्योतिर्लिंगच्या दर्शनाला निघालात....तर जरा थांबा. आहो औरंगाबादपासून अवघ्या ३० कि. मी अंतरावर लहुगड नांद्रा येथे गडावर दगडात कोरलेले ‘रामेश्वर’ मंदिर आहे. प्राचीन मंदिरापैकी हे एक मंदिर आहे. डोंगराने वेढलेल्या निसर्गरम्य परिसरात लहुगडावर जाण्यासाठी चांगले रस्ते झाल्याने हे तीर्थक्षेत्र आता आध्यात्मिक पर्यटनाचे क्षेत्र म्हणून नावारूपाला येत आहे. पर्यटनाच्या राजधानीत १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक वेरुळचे घृष्णेश्वराचे मंदिर व आता लहुगडावरील ‘रामेश्वर’ मंदिर महादेव भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे.

डोंगररांगा, हिरवीगार शेती, अधूनमधून नजरेस पडणारे तलाव, नागमोडी घाट, अशा निसर्गरम्य वातावरणातून लहुगडाकडे जाताना मन हरखून जाते. औरंगाबादला पर्यटनाच्या राजधानीत वेरुळ-अजिंठाशिवाय बघण्यासाठी असंख्य आध्यात्मिक व पर्यटनस्थळ आहेत. लहुगडावर जाताना प्राचीन वारसास्थळाकडे जाताना मन प्रफुल्लित होते. ‘रामेश्वर महादेवाचे दर्शन’ घेण्यासाठी भाविकांना लहुगडावरील पायऱ्या चढून जावे लागते. येथे जुन्या पायऱ्या आहेत व नवीन पायऱ्याचा जिनाही करण्यात आला आहे. जसजसे पायऱ्या चढून वरती जाऊ तसतसे भोवतालीचे निसर्गरम्य वातावरण नजरेस पडते. जेव्हा रामेश्वर मंदिराजवळ पोहोचतो तेव्हा गडावरून निसर्गाचे विहंगम दृश्य डोळे दिपविणारे ठरते.

गडाला कोरून बनले ‘रामेश्वर मंदिर’
लहुगड कोरून ‘रामेश्वर मंदिर बनले आहे. काळ्या पाषाण्यातील मंदिरात तीर्थखांबावर कोरीव नक्षीकाम करण्यात आले आहे. मंदिराचा दरवाजा उत्तर दिशेला असून रामेश्वर महादेवाची पिंड असलेला गाभारा पूर्वमुखी आहे. दक्षिण दिशेला राम, सीता, लक्ष्मणाची मूर्ती तर पश्चिमेला वाल्मीकी ऋषीची मूर्ती ठेवण्यात आली आहे. मंदिरात मध्यभागी नंदी विराजमान आहे. मंदिराबाहेर दक्षिणमुखी गणपती मंदिर आहे. याच मंदिराला लागून पश्चिम बाजूला वरती पाण्याचे कुंड आहे ते स्वच्छ व गार पाण्याने भरलेले आहे.

रामेश्वर मंदिरावर पाण्याचे ८ तळे
संपूर्ण डोंगर, काळ्या पाषाण असलेल्या या लहुगडावर रामेश्वर मंदिरावर चक्क ८ पाण्याचे तळे आहेत. यातील पाच तळ्यातील पाणी हिरवे तर एक तळ कोरडे आहे. पण आणखी दोन तळ्यातील पाणी स्वच्छ व पिण्यायोग्य आहे. हे पाणी भाविक तीर्थ म्हणून पितात. निसर्गाचे अदभुत रूप येथे पाहण्यास मिळते.

रामकालीन मंदिर
येथील भाविकांनी सांगितले की, हे रामेश्वर मंदिर रामकालीन आहे. येथे रामाने शिवलिंगाची स्थापना केल्याचे आख्यायिका आहे. तसेच माता सीतेने याच ठिकाण लव व कुश यांना जन्म दिल्याचा दावाही केला जातो.

तीन मार्गावरून जाता येते लहुगड नांद्राकडे
लहुगडावर जाण्यासाठी तीन मार्गावरून जाता येते यात पळशी, अंजनडोह येथून रस्ता आहे. तसेच दुसरा रस्ता चौका येथूनही जाण्यासाठी आहे. तर तिसरा रस्ता करमाड, लाडसावंगीमार्गे लहुगडला जाता येते.

Web Title: Mahashivratri: Rock carved 'Rameshwar' temple at Lahugad; A scenic ancient heritage site surrounded by hills near Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.