महात्मा ज्योतिबा फुले योजना...... जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:05 AM2021-05-08T04:05:16+5:302021-05-08T04:05:16+5:30
रुग्णालयांना बजावली नोटीस व्हेंटिलेटरवरील रुग्णांव्यतिरिक्त कोविडच्या इतर गंभीर आणि अतिगंभीर रुग्णांना विविध २० पॅकेजअंतर्गत उपचारांच्या योजना आहेत. मात्र, ...
रुग्णालयांना बजावली नोटीस
व्हेंटिलेटरवरील रुग्णांव्यतिरिक्त कोविडच्या इतर गंभीर आणि अतिगंभीर रुग्णांना विविध २० पॅकेजअंतर्गत उपचारांच्या योजना आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. याचिकाकर्त्याने दाखल केलेल्या सुमारे २५ शपथपत्रांपैकी एक लाख ३४ हजारांपर्यंत बिल आकारल्याबाबत आणि शासकीय रुग्णालयात दाखल करून घेतले नाही याबाबत तक्रारी केल्या आहेत. अशा रुग्णांच्या तक्रारी नोंदवून घेऊन संबंधित रुग्णालयांना नोटिसा जारी केल्या आहेत, असे शासनाने शपथपत्रात म्हटले आहे.
चौकट
लाखो रुग्णांवर मोफत उपचार
शासनाने दाखल केलेल्या शपथपत्रात म्हटले आहे की, कोविड सेंटरमधील २६ लाख ४८ हजार ८२७ रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत, तसेच होम आयसोलेशनमधील ४ लाख ४९ हजार ४८५ रुग्ण आणि खाजगी रुग्णालयातील ४ लाख ६ हजार ७४९ रुग्णांनी आरोग्य विम्याचा लाभ घेतला आहे.